नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवगाव मध्ये महाशिवरात्री उत्सव जल्लोषात साजरा – आजचा महाराष्ट्र

नवगाव मध्ये महाशिवरात्री उत्सव जल्लोषात साजरा

प्रतिनिधी सचिन पावशे 

भाविकांची गर्दी… बँड पथकाची साथ…गुलालाची उधळण… भाविकांची अलोट गर्दी आणि हर हर महादेव चा जयघोश सारे कसे शिव महिमेने मंतरलेले या शिवभक्तीच्या महिम्यात नवगाव येथील बोरेश्वर महाराजांचा महाशिवरात्र उत्सव साजरा झाला

रायगड (अलिबाग) : दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्र निमित्त सकाळी ४ वाजल्यापासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमा झाली होती लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत भाविकांची मंदिरात गर्दी दिसत होती.तसेच मंदिरात आपले नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी जमा झाली होती.संध्याकाळी ठीक पाच वाजता बोरेश्वरच्या मंदिरातून पालखी मिरवणूक निघाली पालखीसोबत श्री रघुनाथ महाराज प्रसादिक भजन मंडळ सोबत

होते. पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्तिभावाने हर हर महादेव चा जयघोष करत होते. पालखी सोबत महिला मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या.पालखीसोबत नवगाव मधील तीन बँड पथक सोबत होते.चित्ताकर्षक श्री बोरेश्वर बँड पथक, कर्ण मधुर श्री ज्योती बँड पथक, सूर सम्राट श्री दत्तगुरु ब्रास बँड पथक यांची जुगलबंदी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी जमा केली होती. तसेच पालखी सोबत प्राथमिक शाळेतील मुला,मुलींचे लेझीम डान्स सोबत होते. रायगड जिल्ह्यातून तसेच मुंबई पुणे येथून सुद्धा लोकांनी बँड ची जुगलबंदी तसेच नाटक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. नंतर ज्यांची लोक आतुरतेने वाट पाहत होते असे हास्य जत्रा फेम कलाकार प्रज्ञाकार आणि सोडम निर्मित लेखक/ दिग्दर्शक प्रसाद महादेव खांडेकर ‘ थेट तुमच्या घरातून` हे नाटक सुरू झाले.गुलालाची धुंदी आणि बँडची जुगलबंदी अनुभवल्यानंतर हे नाटक बघण्यासाठी सुद्धा लोकांनी अलोट गर्दी केली होती .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]