सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा येथे “आई नवदुर्गा मातेची स्थापना.
जगाच्या पोशिंदा बळीराजावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी मंडळातर्फे नियमित प्रार्थना.
परिवर्धा / नंदुरबार :- सातपुड्यातील नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धा येथे “श्री नवदुर्गा मित्रमंडळ” सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील, दुष्काळ असूनही सर्व शेतकरी बांधवांसाठी येणाऱ्या काळात तरी आई नवदुर्गा आमचा शेतकरी राजावर कृपा करेल आणि दुष्काळाचे संकट दूर करेल यासाठी “आई जगदंबा,आई नवदुर्गा, आई अंबिका,आई सप्तशृंगी, 
आई अष्टभुजा या सर्व आदिशक्तींची मनोभावे सेवा करून “नवदुर्गा मित्रमंडळ या वर्षी आमचा परिसरातील नव्हे तर संपूर्ण शेतकरी राजावर कृपा करून आलेले संकट दूर करावे अशी प्रार्थना करत या आदिशक्तींना साकडे घालणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका परिवर्धा येथील श्री नवदुर्गा माता मित्र मंडळाचे सेवेकरी, तुकाराम जाधव,समाज शिंपी,ईश्र्वर पाटील, किशोर जाधव,सखाराम जाधव, मुरलीधर सोनार,प्रदीप जाधव, दिगंबर जाधव, वैभव पाटील ,प्रकाश पाटील डॉ.किशोर पाटील,मनोहर भाई पाटील, शरद पाटील,कल्याण जाधव,महेश पाटील प्रदिप पाटील,यांच्यासह सर्व पदाधिकारी,आई जगदंबेचे सेवक यांनी या वर्षी बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी संपूर्ण नवरात्र उत्सवादरम्यान आदिशक्तीला मनोभावे प्रार्थना करून शेतकरी राजा जगाच्या पोशिंदा बळीराजाला या संकटातून बाहेर काढ आणि त्याच्या आयुष्यात भरभराटी सुख समृद्धी नामदेव अशा प्रकारची प्रार्थना यावर्षी या मंडळातर्फे करण्यात येणार आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













