नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ – आजचा महाराष्ट्र

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

प्रतिनिधी सतीश पाटील

मुंबई :- दि.०९/१०/२०२६ रोजी दुपारी ठीक ०३ : ०० वा. सदर कार्यक्रमाला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी दिलेले राष्ट्रपती पदक मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रधान कार्यक्रम लोकभवन (राजभवन) मुंबई येथे संपन्न झाले. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील एकूण १०३ राष्ट्रपती पदक विजेते पोलीस

अधिकारी व अमलदार यांना पदकाचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्रालयातील वरिष्ठ आय ए एस अधिकारी तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते (आयपीएस) मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती (आयपीएस) व महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी तसेच इतर मान्यवर हजर होते. भोम गाव ता. चिपळूण या गावचे सुपुत्र व श्री महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम या शाळेचे माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत सुनंदा तुकाराम साळुंके यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ३५ वर्ष केलेल्या अति उत्कृष्ट उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल भारत सरकारचे राष्ट्रपती यांनी दिलेले राष्ट्रपती पदक मा. राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत सुनंदा तुकाराम साळुंके यांना मिळालेल्या राष्ट्रपती पदकाबद्दल त्यांचे वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले व त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]