श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.
प्रतिनिधी मणिलाल शिंपी
आर एस पी च्या बालसैनिकांनी आपल्या आई वडिलापासून रस्ता सुरक्षेची जनजागृती करावी.: ए. सी.पी. किरण बालवडकर.
ठाणे / कल्याण :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२६ श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, कल्याण (पश्चिम) येथे वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांचा अध्यक्षतेखाली, संस्थेचे अध्यक्ष व्ही.पतारमण, सेक्रेटरी जया गणपती, व्ही रामास्वामी, खजिनदार व्ही. सुब्रमण्यम, कमिटी मेंबर वासंती बालकृष्णन, वाणी विद्या शाळेच्या मुख्याध्यापिका जी.अंजना रेड्डी,सहपोलीस उपनिरीक्षक सुगम साबरे नोडल अधिकारी डॉ.मनिलाल शिंपी, यांचा प्रमुख उपस्थितीत आर एस पी बालसैनिक पथक फलकाचे अनावरण (RSP Road Safety Unit )च्या रस्ता सुरक्षा आणि नशामुक्ती जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले.आर एस पी बालसैनिक व आर एस पी शिक्षक अधिकारी शिक्षकांनी परेड संचलन करत सर्व मान्यवरांना व्यासपीठ पर्यंत नेले केले,व आर एस पी बालसैनिकांनी रस्ता सुरक्षा आणि नशामुक्तीचे
फलक हातात घेऊन स्वागत करण्यात आले.कल्याण, उल्हासनगर वाहतूक शाखेचे ए.सी.पी किरण बालवडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या शैलीत त्यांनी रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. आर एस पी बालसैनिक यांनी आपल्या आई-वडिलांपासून वाहतूक नियमांची जनजागृती करावी असे आवाहन केले.तसेच रस्त्यावरील सर्व बोधचिन्हे आणि त्यांचे अर्थ प्रत्यक्ष चित्र दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विभागीय समादेशक डॉ.मनिलाल शिंपी सर यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरणे का गरजेचे आहे, हे वास्तविक उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच नशामुक्तीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.संस्थेच्या अध्यक्षांनीही आपल्या मनोगतात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेसमोर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रीती त्रिपाठी यांनी केले, तर पाहुण्यांचा सविस्तर परिचय कु. झारा सातपुते यांनी करून दिला.या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती अंजना रेड्डी , पर्यवेक्षक शगजानन वाघ, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि RSP चे सर्व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ठाणे जिल्हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान जिल्हा नोडल अधिकारी जितेंद्र सोनवणे, छान आर एस पी नोडल अधिकारी रमाकांत पाटील, दत्तात्रय पाटील, व पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. वाणी विद्यालयाचे सुपरवायझर व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा विभाग कमिटी सदस्य ज्येष्ठ क्रीडा संघटक गजानन वाघ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













