जय बजरंग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कारिवली संस्थेची ३२ वी अधीमंडळाची वार्षिक सभा संपन्न!
पतसंस्थेच्या मार्फत छोटे व्यावसायिक दुकानदार,लघुउद्योग करणारे व्यापारी, आणि सर्वसामान्यांना तात्काळ कर्जपुरवठा करावा -संजय नाईक
ठाणे / भिवंडी :- छत्रपती शिवाजी महाराज, सभागृह, अजय नगर, भिवंडी येथे रविवार, दिनांक २७/०९/२६ रोजी जय बजरंग पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुण्यांनी केले मार्गदर्शन!संस्थेच्या ३१ वर्षात कारिवली येथे मुख्यालय असलेल्या आणि कोंबडपाडा व नुकतेच नव्याने स्थापन झालेल्या भिनार शाखेमार्फत ह्या पतसंस्थेने ग्रामीण भागातील शेतकरी, दुकानदार,
हातगाडीवाले ,लघुउद्योग करणाऱ्या वर्गाला कमी दरात अर्थपुरवठा तसेच वाहन तारण कर्ज ,सोने गहाण कर्ज तात्काळ देण्याचे काम संस्था करत आहे पतसंस्थेमार्फत, मनी ट्रान्स्फर योजना,राबविण्यात येत आहेत.दैनंदिन ठेव,बचत ठेव,मासिक ठेव,मुदत ठेव असे अनेक खाते वर भरघोस व्याज दिला जात आहे.ह्या कार्यक्रमाला कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.संजय नाईक ,विधी सल्लागार ॲड. दिपक नाईक ,माजी संचालक ॲड. अरुण पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते पतसंस्थेचे अध्यक्ष श्री .संजय सुरेश नाईक यांनी पाहुण्यांचे आणि सभासदांचे स्वागत करीत ,संस्थेच्या उपाध्यक्ष,मानद सचिव ,आणि सर्व संचालक यांच्या मदतीने भविष्यात मोठी करण्याचे काम करणार आहोत या प्रसंगी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ.पूनम पाटील,मानद सचिव श्री. विजय नाईक,संचालक श्री.गणेश घरत,दयानंद पाटील यांनी मार्गदर्शन केले.ॲड. दिपक नाईक आणि ॲड.अरुण पाटील यांनी संचालक आणि कर्मचारी यांना पतसंस्था वाढीसाठी,कर्ज वसुलीबाबत कायदेशीर सल्ला दिला कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापक श्री.अभिमन्यु पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी संचालक देवराज नाईक , श्री.दयानंद पाटील,संतोष घरत ,श्री.प्रकाश पाटील,घनश्याम गोसावी,मोहन चौधरी,पंडित कोते यांनी विशेष परिश्रम घेतले संचालक श्री.भारत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













