नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लायन्स क्लब ऑफ सावर्डे,आयडियल तर्फे शिक्षकदिन उत्साहात साजरा ! – आजचा महाराष्ट्र

लायन्स क्लब ऑफ सावर्डे,आयडियल तर्फे शिक्षकदिन उत्साहात साजरा !

प्रतिनिधी दिपक कारकर

विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचा गौरव 

चिपळूण :- ५ सप्टेंबर १८८८ रोजी जन्मलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या अगाध बुद्धिमत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर भारतीय तत्त्वज्ञानाचा ठसा उमटवला. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकपदापासून ते भारताचे सोव्हिएत युनियनमधील राजदूत, पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशसेवा केली.शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा आदर करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस (५ सप्टेंबर)

संपूर्ण भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.उपरोक्त संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य ज्ञान,संस्कार आणि मूल्यांची अमूल्य शिदोरी देणाऱ्या आदरणीय शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा नुकताच सोमवार दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी,हॉटेल रिवाज,सावर्डे येथे संपन्न झाला.या सोहळ्या प्रसंगी श्री.रविंद्र घाणेकर सर,सौ.चित्रा कानडे मॅडम,सौ.अश्विनी पाटील मॅडम,सौ.मीरा मॅडम,सौ.प्राची मॅडम आणि श्री.शिगवण गुरुजी यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाला लायन डॉ.रश्मी पाटील,लायन डॉ.वर्षा खानविलकर,लायन डॉ.निलेश पाटील,लायन डॉ.अजित गावकर, लायन,प्राची गोखले,लायन मीरा पाध्ये,लायन राधिका शिंदे लायन ऋतुजा देवळेकर आणि लायन अनंत शिगवण गुरुजी उपस्थित होते.

“शिक्षक हा केवळ ज्ञान देत नाही,तर आयुष्याला योग्य दिशा देतो.”

खरंतर ह्या जाणीवेतून शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि सेवेच्या माध्यमातून समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणाऱ्या लायन्स क्लब सावर्डे आयडियल संस्थेच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]