नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदरणीय तिर्थरूप डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यात शोषखड्डा निर्मिती उपक्रम – आजचा महाराष्ट्र

आदरणीय तिर्थरूप डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यात शोषखड्डा निर्मिती उपक्रम

 

प्रतिनिधि राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने डॉक्टर श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यातील भरणे, भडगाव, वेरळ, कळमणी, शेरवली या गावांमध्ये शोषखड्डा निर्मिती उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. वाया जाणारे सांडपाणी

जमिनीमध्ये झिरपावे तसेच सांड पाण्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून सांडपाण्याचे नियोजन करून जमिनीमध्ये झिरपावे यासाठी शोषखड्डा निर्मितीचा राबविण्यात आला.वेरळ, भरणे, भडगाव,कळमणी, शेरवली या गावातील वाडी वस्तीवर खड्डा निर्मिती राबविण्यात येऊन, शोष खड्ड्याचे महत्व व निर्मिती याबाबतही ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले.या उपक्रमात खेड तालुक्यातील १०० श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता.डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठांच्या वतीने खेड तालुक्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविले जातात.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]