नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी च्या वतीने अपघात ग्रस्त विद्यार्थींच्या वारसाला धनादेश सुपूर्द – आजचा महाराष्ट्र

माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी च्या वतीने अपघात ग्रस्त विद्यार्थींच्या वारसाला धनादेश सुपूर्द

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- रायगड जिल्ह्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी चे दोशी वकील आर्टस् कॉलेज अँड जी.सी.यू. बी.सायन्स अँड कॉमर्स कॉलेज गोरेगांव रायगड येथे शिकणारा कै.शुभम मधुकर उचाटे याचा अपघात दि.२८/०१/२०२३रोजी म्हसळा बायपास येथे रस्ते अपघात झाला होता,त्याला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हालविण्यात आले व तिथून तातडीने सूरज हॉस्पिटल सानपाडा येथे नेण्यात आले व दि.०१/०२/२०२३ रोजी त्याचा मृत्यु झाला.

महाविद्यालया तर्फे सर्व विद्यार्थ्यांचा दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी च्या वतीने अपघात विमा उतरविला जातो त्या कंपनी तर्फे पॉलिसी रक्कम मंजूर करून घेण्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री.श्रीनिवास बेंडखळे,तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.विजयराज खुळे,सचिव श्री.प्रसाद मराठे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.होटकर सर तसेच गोरेगाव येथील समाजसेवक/पत्रकार श्री. सिकंदर आंबोणकर, महाविद्यालयातील अधीक्षक श्री.जयेश शेठ या सर्वांच्या प्रयत्नाने सदर मृत विध्यारत्याच्या पालकांस २ लाख रू. विमा मंजूर करून घेण्यात आला व त्याचे वडील श्री मधुकर उचाटे यांना धनादेश संस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते देण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]