नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मॉडर्न इंग्लिश स्कूल मोर्बा येथे पूर्व प्राथमिक शाळेत प्रथम दिनी चिमुकल्या विध्यार्थांचे जोरदार स्वागत – आजचा महाराष्ट्र

मॉडर्न इंग्लिश स्कूल मोर्बा येथे पूर्व प्राथमिक शाळेत प्रथम दिनी चिमुकल्या विध्यार्थांचे जोरदार स्वागत

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव ):- मॉडर्न इंग्लिश स्कूल मोर्बा येथे पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रथम दिनी स्वागत सोहळा थाटामाटात पार पडला, चिमुकल्या विध्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा परिसर ची साफसफाई करुन, शाळेच्या वर्गाणा आतून फुले , फुगे , खेळणी ,

रिबन द्वारे सजावट करण्यात आली होती तर शाळेचा पटांगण व समोरील भाग फुगे व अनेक प्रकारचे चित्र व फ्लकांवर लिहिलेले स्वागत सुविचार देखनीय ठरले. शाळेत पाल्यांसह प्रथम दिनी येणाऱ्या नवोगत विध्यार्थ्यांचे बेंड बाजा वाजवत , लेजीम खेळत गीत गाऊन व तळ्यांच्या जोरदार कडकडाटात जोरदार आगमन करण्यात आले, आगमनानंतर प्रत्येकी नवोगत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन टाळ्यांच्या कडकडाडात भव्य स्वागत करण्यात आले, नवजात बालकांची शालेय विषयी भीती दूर होऊन गोडी लागावी व शालेय विषयी आपुलकी प्रेम व जिव्हाळा निर्माण होऊन बालकांमध्ये शिक्षण्याकरिता चैतन्य निर्माण व्हावे व त्यांचे शाळा प्रवेश स्स्मरणीय व यादगार व्हावे हे खरे स्वागत सोहळा आयोजनाचे उद्देश .

मॉडर्न एजुकेशन अध्यक्ष चे अध्यक्ष व नुकतेच हज साठी रवाना होणारे डॉक्टर सैफुददीन उमर धनसे यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर सैफुद्दिन धनसे, मॉडर्न हायस्कूल चे मुख्याध्यापक मोहन साली , इक्बाल भाई धनसे , नजीर धनसे, जनाब शौकत रोहेकर , इकबाल हर्णेकर , व अन्य उपस्थित मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन

स्वागत करण्यात आले, उपस्थित अध्यक्ष व मान्यवरांकडून भाव्य सत्कार समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी नुकत्याच नियुक्त झालेल्या पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रभारी राजयश्री कांबळे पूर्वप्राथमिक शाळेच्या शिक्षिका फाईजा दाखवे व शिरीन चिलवान तसेच माध्यमिक व पूर्वप्राथमिक शाळेच्या शिक्षक व कर्मचारी वृंद व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांने घेतलेल्या मेहनतीचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]