शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात इनकमिंग सुरु..
पत्रकार जितिन शेट्टी
रायगड (पनवेल) :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना शहर प्रमुख सुर्यकांत म्हसकर यांच्या विशेष प्रयत्नाने कळंबोली येथील शेकडो शीख बांधवांनी आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

तसेच यावेळी श्री. नरेंद्रसिंग होटी यांची उपशहर प्रमुख कळंबोली पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी सर्व शीख बांधवांचे शिवसेना पक्षात स्वागत केले

याप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, शहर प्रमुख खारघर गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर समन्वयक गिरीश धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, विभाग समन्वयक संजय कानडे, महिला आघाडीच्या कळंबोली शहर संघटीका सौ. ज्योती मोहिते, शहर संपर्क संघटीका सौ. रत्नमाला शिंदे, उपशाखा प्रमुख कैलास कांदळकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













