ऑपरेशन टायगर संदर्भात कोणतीही बैठक नाही – शिंदे
प्रतिनिधी
मुंबई – राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशा वल्गना शिंदेसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत होत्या. त्यासाठी उपमुख्यमंत्री व शिंदेसेनेचे मुख्य पक्षनेते एकनाथ शिंदे गेल्या महिन्यात दिल्लीत ठाण मांडून होते. दिल्लीतील बड्या नेत्यांची भेट घेतली काही खासदारांच्या भेटीगाठी घेतल्याचे बोलले जात असताना ठाकरेसेनेचे काही खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मुंबई आल्यावर ठाकरेसेनेचे ८ खासदार गळाला लागल्याच्या चर्चांनी जोर धरला. मात्र अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे शिंदे यांनीच स्पष्ट केले आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा आता थंड झाल्यावर आज एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी गेले आणि पुन्हा ठाकरेसेनेला खिंडार पाडण्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण आता यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी असतानाच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचा दावा करण्यात येत होता. ठाकरेसेनेचे ८ खासदार शिंदे गटात येणार असल्याच्या चर्चांना आता उधान आले आहे. मात्र शिंदेसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचे सांगितले. मात्र महाराष्ट्रातील मराठी खासदार आम्ही दिल्लीत चहापान किंवा भोजना निमित्त भेटत असतो.याचा अर्थ पक्ष बदलणार असे काही नसते. खासदार अरविंद सावंत तुमच्याकडे येणार असे विचारता मस्के म्हणाले त्यांच्याच पक्षात कोणीतरी असेल जे त्यांच्या विरोधात असतील असे मस्के म्हणाले. तर खासदार अरविंद सावंत यांनी याविषयीचे वृत्त धादांत खोटी असल्याचे आणि हा खोडसाळपणा असल्याचा आरोप केला आहे.येच्या २४ एप्रिल रोजी सुप्रिम कोर्टात शिवसेना कुणाची याची अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे गोटातूनही पटापट प्रतिक्रिया समोर आल्या. अगोदर खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यावर मौन सोडले. ठाकरेसेनेच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीचे वृत्त पूर्णता निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. ठाकरेसेनेचे खासदार शिंदे शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. निराधार बातम्या माध्यमांनी देऊ नयेत असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी तर ऑपरेशन टायगर विषयी एका महिन्यात तुम्हाला ठोस माहिती मिळेल. कोण येणार आणि कधी येणार याविषयीचे संकेत दिले आहेत. तर भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाच्या आमदार खासदारांना वेळ देत नसतील त्यामुळे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आले असावेत असा चिमटा ठाकरेसेनेला काढला आहे. शिंदेसेनेच्या नेत्या खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी होणार असल्याचा दावा केला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वृत्तात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले. ठाकरेसेनेचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार नाहीत असे देशमुख म्हणाले. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन टायगरच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत यावर पडदा टाकला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













