भिवंडी तालुका वाहतूक संघटकपदी दत्ता भोईर यांची नियुक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नियुक्तीपत्र प्रदान
प्रतिनिधी
ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) दि.१२ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भिवंडी तालुका वाहतूक संघटकपदी दत्ता भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे उपनेते विश्वास काळूराम थळे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात
आली.शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी शिवसेनेच्या रांजनोली नाका, कल्याण-भिवंडी रोड येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे उपनेते विश्वास काळूराम थळे व तालुकाप्रमुख करसन धोंडू ठाकरे यांच्या हस्ते दत्ता भोईर यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान 
करण्यात आले.यावेळी संपर्कप्रमुख सोन्या काशीनाथ पाटील, जिल्हाप्रमुख कुंदन तुळशीराम पाटील, जिल्हा सचिव जयनाथ रामदास भगत आणि उपजिल्हा संघटक कृष्णा वाकडे यांची उपस्थिती होती.नवनियुक्त तालुका वाहतूक संघटक दत्ता भोईर यांच्यावर भिवंडी तालुक्यात पक्षाच्या वाहतूक संघटनेचे कार्य अधिक 
प्रभावीपणे वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाची ध्येय-धोरणे व विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच वाहतूक क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













