कुर्डूस (देऊळ आळी) ता-अलिबाग येथे बांधली विहिरीत अनोखी दहीहंडी या अनोख्या दहीहंडीची २७ वर्षांपासून परंपरा चालू
रायगड / आलिबाग प्रतिनीधी,
आलिबाग (कुर्डूस) –कुर्डूस,( देऊळआळी) तालुका अलिबाग जिल्हा रायगड या गावातील लामणी विहीर म्हणजे पाण्याचा एक मुख्य स्त्रोत, देऊळआळी मधील अवलिया तरुणांनी एकत्र येऊन सन १९९१ मध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी बालगोपाळांची पारंपरिक दहीहंडी फोडल्यानंतर विरंगुळा म्हणून लामणी विहिरीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने दहीहंडी बांधली व तरुणांना त्यांचे कौशल्य पणास लावण्यास भाग पाडले, कारण दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे लावण्यासाठी खाली जमीन नव्हती, तर खोल ४० फूट पाणी होते. तरुणांना हंडी फोडण्यासाठी दुसरा मार्ग शोधणे भाग पडले, त्यासाठी तरुण मुलांनी विहिरीच्या कठड्यावर थर रचून, एकेकट्याने उडी मारून ती दहीहंडी फोडायची असे ठरले व ते आजतागायत अव्याहतपणे चालू आहे.

या परंपरेला आता २७ वर्षे उलटून गेली आहेत, परंतु अजून कोणताही गोविंदा जखमी झालेला नाही, ही श्री. कृष्णाची कृपाच म्हणावी लागेल.
आजमितीला गावातील सर्व मंडळे एकत्र येऊन दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करतात व त्यात त्यांना यश देखील येते. सदर दहीहंडी ची परंपरा चालू ठेवण्यामागे गावाची, आळीची व तरुण मंडळींची एकताच कारणीभूत आहे.
गावातील कै. विद्याधर पिंगळे, श्री. दिपक थले, श्री. विकास थले श्री शशिकांत पिंगळे यांच्या यांच्या पुढाकाराने सुरू झालेली हंडी आज संपूर्ण विभागातील आबालवृद्धांच्या एक वैशिष्टय़पूर्ण बाब बनून राहिली आहे अशी माहिती श्री. गुरुनाथ शेरमकर, श्री मनोहर पाटील, श्री. सुशीलकुमार पिंगळे व श्री. भालचंद्र पाटील यांनी प्रतिनिधीं सोबत बोलताना सांगितले त्यांनी असेही सांगितले की, श्री. कृष्णाच्या कृपेने आमची परंपरा अशीच कायम चालू राहील असा आम्हा सर्वांचा विश्वास आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













