नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माणगाव-तळा तालुका जंगम समाज मंडळातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

माणगाव-तळा तालुका जंगम समाज मंडळातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी महेश स्वामी

रायगड (माणगाव) :- (आ.मा.टॉ.टे.न्यू) दि. १ ऑगस्ट : माणगाव-तळा तालुका जंगम समाज मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्यास परमपूज्य श्री गुरु राष्ट्रसंत पद्मभास्कर ष. ब्र. १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य सद्गुरु धारेश्वर महाराज (अधिमठ संस्था, धारेश्वर, जि. सातारा) तसेच श्री गुरु ज्ञानभास्कर कीर्तनरत्नाकर ष. ब्र. १०८ श्री महादेव शिवाचार्य वाईकर महाराज (वाई मठ संस्थान, जि. सातारा) यांचे दिव्य सान्निध्य लाभले.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित गुरु महाराज व समाजबांधवांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अपर्णाताई जंगम यांनी केले, तर प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष माहेश्वरमूर्ती महेंद्र स्वामी यांनी केले. यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात रायगड जिल्हा वीरशैव माहेश्वर

मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण स्वामी, म्हसळा तालुका अध्यक्ष रामलिंग स्वामी, पोलादपूर तालुका अध्यक्ष, रोहा व सुधागड वीरशैव माहेश्वर मंडळाचे पदाधिकारी तसेच विनायक स्वामी (नांदवी) यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.त्यानंतर श्री गुरुंची पाद्यपूजा संपन्न झाली. गुरु महाराजांनी आपल्या आशीर्वचनातून गुरुपौर्णिमेचे

महत्त्व, गुरुशिष्य परंपरा, देव, देश आणि धर्म यांचे जतन करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. समाजाने संघटित राहून संस्कार व सामाजिक ऐक्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच माणगाव-तळा जंगम समाज मंडळाच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करून भविष्यातही अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहो, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त केली.कार्यक्रमाची सांगता श्री गुरुंच्या मंगल आरतीने झाली. आभारप्रदर्शन मा.मू. अविनाश स्वामी यांनी केले.या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, रोहा, सुधागड, तळा, म्हसळा, पोलादपूर आदी तालुक्यांतील माहेश्वर

(जंगम) समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन माणगाव-तळा जंगम समाज मंडळाचे अध्यक्ष मा.मू. महेंद्र स्वामी, कार्याध्यक्ष मा.मू. लक्ष्मण गुरुजी, उपाध्यक्ष मा.मू. गजानन स्वामी, सचिव मा.मू. प्रशांत स्वामी, खजिनदार मा.मू. कल्पेश स्वामी, सहसचिव मा.मू. अविनाश स्वामी व मा.मू. संतोष स्वामी तसेच सदस्य मा.मू. मंदार स्वामी, प्रकाश स्वामी, लक्ष्मण स्वामी, विनायक स्वामी, राजेश स्वामी, संदीप स्वामी, अमोल स्वामी, गणेश स्वामी, दीपक स्वामी, केशव स्वामी, प्रणव स्वामी आणि सर्व महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी यशस्वीरीत्या केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]