इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मा. महापौरांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक….
प्रतिनिधी
भिवंडी :- दिनांक ३०.०७.२०२६ रोजी गंगाराम वाडी येथे रात्री घडलेल्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर *भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे *मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी* यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मा. उपायुक्त (अन. बांधकाम) श्री. विक्रम दराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. संदिप गाडेकर, सहायक आयुक्त (शिक्षण) श्री. नितीन पाटील, सहायक आयुक्त आरोग्य श्री. फैसल तातली, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्र. 1 श्री. समीर जवरे, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्र. 2 श्री. विनोद मनोरे, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्र. 3 श्री. नितेश चौधरी, सहायक आयुक्त प्रभाग 
समिती क्र. 4 श्री. अरविंद घुगरे, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्र. 5 श्री. गिरीष घोष्टेकर, अग्निशमन अधिकारी श्री. नितीन चव्हाण, सुरक्षा विभाग प्रमुख श्री. सुदाम जाधव, वाहन विभाग प्रमुख श्री. शेखर चौधरी, आस्थापना विभाग प्रमुख श्रीमती कल्याणी चन्ने, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री. शाकीब खर्बे इ. उपस्थित होते. या बैठकीमध्ये मा. महापौर यांनी शहरातील सर्व धोकादायक/ अति धोकादाय इमारतींचा आढावा घेतला. तसेच, काल झालेल्या दुर्घटनेतील रहिवाशांची निवासाची व भोजन व्यवस्थेचादेखील आढावा घेतला. या बैठकीमध्ये मा. उपायुक्त (अन. बांधकाम) श्री. विक्रम दराडे यांनी शहरातील सर्व धोकादायक/ अतिधोकादाय इमारतींची माहिती सादर केली असता, मा. महापौर महोदयांनी धोकादायक/ अति धोकादाय इमारती व आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.C1 प्रवर्गातील 238 व C2A प्रवर्गातील 836 इमारतींचे नळ व वीज पुरवठा खंडीत करुन त्या तात्काळ निर्मनुष्य करण्याची कार्यवाही करावी. धोकादायक व अति धोकादायक इमारतीनां नोटीस बाजावताना जागामालक/ भोगवटदार यांना पंचनाम्याची प्रत देण्यात यावी. धोकादायक व अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करावयाचे झाल्यास महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये 5-6 दिवसांकरिता स्थलांतरीत करावे. धोकादायक/अति धोकादायक इमारतीचे निष्कासन करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करताना सदर पत्रामध्ये कलम 268 चा उल्लेख करुन पोलीस बंदोबस्ताची मागणी करावी. धोकादायक/अति धोकादायक इमारतींचा वीज पुरवठा खंडीत करण्याची पुर्णत: जबाबदारी ही टोंरेंट पॉवर कंपनीची असेल, मात्र प्रभाग अधिकाऱ्यांनी विहीत वेळेत त्यांना पत्राद्वारे कळविण्याची दक्षता घ्यावी. धोकादायक/अति धोकादायक घोषित केलेल्या इमारतींच्या ठिकाणी विनापरवानगी दुरूस्तीचे काम सुरू नाही ना याची खात्री करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तसेच रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी समक्ष जाऊन पहाणी करावी. आवश्यकतेनुसार प्रभाग निहाय मोठे डंपर व जेसीबी भाड्याने उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही वाहन विभागाने करावी. प्रभाग अधिकाऱ्यांना नविन बोलेरो जीप वाहने उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव वाहन विभागाने सादर करावा. अग्निशमन विभागाच्या वाहनांची वेळोवेळी निगा दुरूस्ती करण्यात यावी. वैद्यकीय आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. आपत्कालीन परिस्थीतीकरिता एक रुग्णवाहिका भाड्याने घेऊन ती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सुपूर्द करावी. प्रभाग कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे रोड कामगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आस्थापना विभागाची राहील.*(श्रीकांत परदेशी)**माहिती व जनसंपर्क अधिकारी**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका*
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













