भिवंडीतील टोरेंट पॉवर हटविण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार – खासदार सुरेश म्हात्रे
प्रतिनिधी
भिवंडी :- ( आ. मा. टॉ. टे. न्यू ) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.या भेटीदरम्यान भिवंडीतील टोरंट पावर हटविण्यासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असून टोरंट पॉवर बरोबरच मुरबाड रेल्वे, व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशा तीन मुद्द्यांवर पंतप्रधानांची चर्चा करणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे. रविवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना खा.सुरेश म्हात्रे यांनी ही माहिती दिली आहे.भिवंडीतील टोरेंट पॉवरची मुदत जानेवारी २०२७ मध्ये संपणार असून त्यापूर्वी टोरंट पावरचा पुढील कालावधीत वाढ करू नये अथवा मुदत वाढ देण्यात येऊ नये या मागणीसाठी संसदीय अधिवेशनानंतर रणनीती आखणार असून यासाठी भिवंडीत भव्य आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती देखील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी दिली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













