महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिध्दनाथ म्हात्रे मनसे तालुका अध्यक्ष यांनी दिले अलिबाग रेवस बस सेवा मांडव्यामार्ग करण्याचे एस.टी.महामंडळाच्या कार्यालयात निवेदन.
प्रतिनिधी स्वाती जाधव
रायगड (अलिबाग) :– अलिबाग तालुक्यातील रेवस खारेपाट विभाग बस सेवा पर्यायी मार्गाने अलिबाग-मांडवा मार्ग तात्काळ सुरू करण्याबाबत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंञक रायगड यांना निवेदन देण्यात आले. अलिबाग-रेवस खारेपटीतील रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील बस सेवा सध्या खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विशेषत:महिला,विदयार्थी,ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरदार वर्गाला मोठया प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या
भागातील अनेक महिला आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी दररोज अलिबाग येथे कामासाठी ये जा करतात. तसेच अलिबाग येथील विविध शाळा,महाविघालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणारे अनेक विघार्थीही या बस सेवेवर अवलंबून आहेत. बस सेवा बंद असल्यामुळे त्यांना आर्थिक, शैक्षणिक व दैनंदिन प्रवासाच्या गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदर परिस्थितीचा विचार करून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यत नागरिकांच्या सोयीसाठी अलिबाग -मांडवा मार्गे अलिबाग -रेवस खारेपाट विभाग बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात यावी. अशी नम्रविनंती आहे यामुळे सर्वसामान्य प्रवांशाना मोठा दिलासा मिळेल. व त्यांचा दैनंदिन प्रवास सुरळीत होण्यास मदत होईल. तरी जनहिताचा विचार करून या मागणीवर सहानुभूतीपूर्वक व तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













