सत्य वार्ता टीव्ही न्यूजच्या १५व्या वर्धापन उस्ताहात संपन्न! सामाजिक बांधिलकी जपत वर्धापन दिन साजरा…
प्रतिनिधी
भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे.न्यू) गेल्या १५ वर्षांपासून भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील महत्त्वाच्या बातम्यांना प्राधान्याने प्रसिद्धी देणाऱ्या लोकप्रिय सत्य वार्ता टीव्ही न्यूज या वृत्तवाहिनीचा १५वा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी साजरा 
करण्यात आला. या निमित्ताने गरजू महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी कामतघर, साईनगर येथील शिवकृपा बिल्डिंगच्या
तळमजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेकडो गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच गीत-संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उपस्थित महिला व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आनंद
घेतला.सत्य वार्ता टीव्ही न्यूजचे संपादक लवलेश सुतार आणि कार्यकारी संपादिका नीलम तिवारी यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वर्धापन दिनाचे औचित्य साधून गरजू महिलांना मदतीचा हात देण्यासाठी साडी वाटप करण्यात येत आहे. ही सामाजिक 
परंपरा कायम ठेवत यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ स्थानिक नगरसेवक व धर्मराजा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश हरिचंद्र चौधरी, माजी नगरसेविका अस्मिता राजेश चौधरी, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर 
बळीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष स्वाती रामचंद्र कांबळे, भाजप भिवंडी शहर जिल्हा उपाध्यक्ष सत्वशिला जाधव, भाजप भिवंडी शहर जिल्हा सचिव बालमुकुंद शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) भिवंडी 
शहर जिल्हा उपाध्यक्ष सविना नूरअली अन्सारी, उपाध्यक्ष इरफाना बागवान, समाजवादी पक्षाच्या नेत्या हसीना अन्सारी, पत्रकार चंद्रप्रकाश तिवारी, सुनील पांडेय तसेच रमण पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्य वार्ता टीव्ही न्यूजचे संपादक लवलेश सुतार व कार्यकारी संपादिका नीलम तिवारी यांनी स्वागत व सत्कार केला. त्यानंतर उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्य वार्ता टीव्ही न्यूजच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण वृत्तवाहिनी परिवाराला शुभेच्छा दिल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे दै.स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी 
यावेळी बोलतांना सांगितले.कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या गीत-संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात उत्साह आणि आनंद निर्माण केला. साडी प्राप्त झालेल्या महिलांनीही आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी सत्य वार्ता टीव्ही न्यूजचे संपादक लवलेश सुतार यांनी उपस्थित सर्व मान्यवर, सहकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानले.पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करण्याबरोबरच भविष्यातही सामाजिक कार्याची ही परंपरा सातत्याने पुढे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













