भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी जयनाथ भगत यांची बिनविरोध निवड”जगन्नाथाचा रथ एकट्याने नाही, सर्वांनी मिळून ओढायचा असतो” – विश्वास थळे
प्रतिनिधी
ठाणे (भिवंडी) :- दि. ३० (आ.म.टॉ.टे.न्यू) : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनेश वसंत म्हात्रे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतीपदासाठी गुरुवार, दि.३० जुलै २०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था भिवंडी तथा अध्यासी अधिकारी
बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कै. आत्माराम सखाराम गुळवी सभागृहात झालेल्या या निवडणुकीत जयनाथ रामदास भगत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले.निवडीची घोषणा होताच उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसभापती जयनाथ भगत यांचे पुष्पगुच्छ देऊन 
अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन बाळाराम पाटील, मावळते उपसभापती मनेश वसंत म्हात्रे, सचिव प्रवीण प्रल्हाद गायकवाड तसेच संचालक अनंता दुंदाराम पाटील, विष्णू मारुती पाटील, शरद आंबो पाटील, संजय दामोदर पाटील, मोहन गणपत म्हणेरा, ज्ञानेश्वर यशवंत पवार, प्रकाश शंकर भोईर, सुरेश रामभाऊ कोलपे, मिराबाई बाळाराम गायखे, निलम गणेश पाटील, महेंद्र द्वारकानाथ पाटील, सागर गोविंद देसक, श्रीराम गजानन पाटील, ख्वाजा अन्वर कुरेशी आणि विकास वामन देसले यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित उपसभापती जयनाथ भगत यांनी सर्व संचालक व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे ग्रामीण सचिव जयनाथ रामदास भगत यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना नेते विश्वास थळे, तालुकाप्रमुख करसन धोंडू ठाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. सोन्या
काशीनाथ पाटील, कृष्णा वाकडे, दीपक पाटील, प्रवीण पाटील, अनंता पाटील, हनुमान पाटील, भाजप नेते दत्तात्रय पाटोळे, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित नकुल पाटील, भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमनाथ म्हात्रे, माजी सभापती विकास अनंत भोईर, राम एकनाथ भोईर (सरपंच, वळ), ॲड. महेश म्हात्रे (सरपंच, कालवार) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते विश्वास थळे म्हणाले, “जगन्नाथाचा रथ हा एकट्याला ओढता येत नाही, तो सर्वांनी मिळून ओढायचा असतो. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यासच विकासाला गती मिळते आणि यश संपादन करता येते.”
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













