नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ ठिकाणी एअर बलूनद्वारे मतदान जनजागृती – आजचा महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ ठिकाणी एअर बलूनद्वारे मतदान जनजागृती

प्रतिनिधि

सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्विप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात 4 ठिकाणी महाकाय अशा एअर बलूनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. आरोस येथे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या उपस्थितीत एअर बलुन हवेत सोडण्यात आला. या बलुन वर लोकशाहीचा खरा आधार…मतदार, प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे, सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे….अशा प्रकारची जनजागृतीपर वाक्ये या बलूनवर आहेत.

कुडाळ येथे कुडाळ विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सावंतवाडी येथे सावंतवाडी विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, कणकवली विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या उपस्थितीत बलून हवेत सोडण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]