आदरणीय तिर्थरूप डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यात शोषखड्डा निर्मिती उपक्रम

रत्नागिरी (खेड) :- आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने डॉक्टर श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यातील भरणे, भडगाव, वेरळ, कळमणी, शेरवली या गावांमध्ये शोषखड्डा निर्मिती उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. वाया जाणारे सांडपाणी 
जमिनीमध्ये झिरपावे तसेच सांड पाण्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून सांडपाण्याचे नियोजन करून जमिनीमध्ये झिरपावे यासाठी शोषखड्डा निर्मितीचा राबविण्यात आला.वेरळ, भरणे, भडगाव,कळमणी, शेरवली या गावातील वाडी वस्तीवर खड्डा निर्मिती राबविण्यात येऊन, शोष खड्ड्याचे महत्व व निर्मिती याबाबतही ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले.या उपक्रमात खेड तालुक्यातील १०० श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता.डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठांच्या वतीने खेड तालुक्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविले जातात.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













