नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कृषी अधिकारी कार्यालय माणगांव यांच्या मार्फत पेरणी साठी हरभरा मुग कडधान्य बियाणांचे चिंचवली ग्रामपंचायत येथे वाटप – आजचा महाराष्ट्र

कृषी अधिकारी कार्यालय माणगांव यांच्या मार्फत पेरणी साठी हरभरा मुग कडधान्य बियाणांचे चिंचवली ग्रामपंचायत येथे वाटप

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगांव यांच्या मार्फत पेरणीसाठी हरभरा, मुग कडधान्य बियाणांचे चिंचवली ग्रामपंचायत येथे वाटप करण्यात आले यावेळी चिंचवली ग्राम

पंचायत विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते यावेळी ता कृषी सहाय्यक अधिकारी सावंत मॅडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कडधान्य पेरणी संदर्भात व त्यावर होणाऱ्या रोगांविषयी उपाय योजना करण्या संदर्भात विशेष माहिती दिली तसेच सरपंच नंदु पारावे यांनी कृषी खात्याकडुन चिंचवली ग्रा पं हद्दीतील शेतकरी

बांधवाना दिलेल्या योजने संदर्भात आभार व्यक्त केले यावेळी व्यासपिठावर सरपंच नंदु पारावे, कृषी सहाय्यक अधिकारी सावंत मॅडम, ग्रा.पं सदस्या अंजली चव्हाण,सपना पहेलकर,दर्शना भंडारी, ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत होळकर, उत्तम कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोषल मिडिया रायगड जिल्ह अध्यक्ष तसेच ग्रा. पं. सदस्य विलास यादव चिं ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विठठल गवसकर, विभागातील शेतकरी बंधु भगिनी, ग्रा. पं. कर्मचारी हे उपस्थित होते ह्या कार्यक्रमा वेळी उपस्थित ग्रामस्थ यांना आयुष्यमान भारत तसेच आभा कार्ड काढण्यास सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]