सांदोशीत कावल्या बावल्या खिंड शौर्यदिन साजरा…
प्रतिनिधी रामजी कदम
रायगड ( माणगाव ):- (आ.म.टॅा.टे.न्यू )दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या उत्तरेस असलेल्या कावल्याबावल्या खिंडीत वीर जिवाजी सर्कले नाईक आणि सरदार गोदाजी जगताप यांनी केलेल्या अतुलनीय शौर्याची स्मृती जागविण्यासाठी यंदा दहाव्या वर्षी सांदोशी गावात शौर्यदिन इतिहास क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.दरवर्षीप्रमाणेच सर्कले नाईक परिवार आणि दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सांदोशी गावातील वीरगळ पूजन , ग्रामदेवता पूजन , कोकणदिव्याच्या पायथ्याशी खिंडीत अभिवादन, मान्यवरांची व्याख्याने याहीवर्षी आयोजित करण्यात आले होते.कावल्या बावल्या खिंडीत घडलेल्या रक्तरंजित लढाईत सांदोशीचे
सुपुत्र वीर जिवाजी सर्कले नाईक यांना मोगली सरदार शहाबुद्दीन खानाच्या हजारोच्या सैन्याला रोखताना वीरमरण लाभले.आणि त्याचवेळेस हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज राजधानी रायगडाहून निसटून यशस्वीरीत्या जिंजीला पोहोचले. वीर जिवाजी सर्कले यांच्या असामान्य पराक्रमाची दखल मात्र इतिहासाने घेतली नाही परंतु नक्कीच एक दिवस अवघ्या महाराष्ट्रात ही शौर्यकथा घराघरात पोहोचेल असं मनोगत ॲड. आकाश भोंडवे पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच बालशिवव्याख्याती वृंदा सर्कले , दुर्गरक्षक फोर्सचे जयकांत शिंक्रे यांनीही प्रसंगोचित व्याख्यान दिले.सांदोशी शौर्यदिन सोहळ्यासाठी सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीचे महेशस्वामी जंगम, दुर्गवीर प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष हसुरकर, जिजामाता विद्यालय कोंझरचे मुख्याध्यापक इनामदार, छत्रपती शंभूचरित्र ग्रंथलेखक सुशांत उदावंत , अनंत यादव , डाॅ.शीतल मालुसरे , योगेश देवगिरकर , सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीचे सदस्य अनंतराव जोशी , भरत सातांबेकर , आजचा महाराष्ट्र टाॅप टेन न्यूजचे संपादक प्रसाद मोरे , पत्रकार अजय लोटणकर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सोहळ्याचे नियोजन प्रदिप सर्कले , गणेश सर्कले , निलेश सर्कले , आकाश सर्कले , संदिप सर्कले , कैलास सर्कले , अजय सर्कले , नारायण सर्कले , जितेश सर्कले , प्रमोद सर्कले , मधुकर सर्कले यांनी केले.सूत्रसंचालन इतिहास अभ्यासक रामजी कदम यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













