कोलाड पंचक्रोशीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा
प्रतिनिधी महेश स्वामी जंगम
रायगड (कोलाड) :-(आ.म.टॅा.टे.न्यू ) पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पंचक्रोशीतील सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाची सुरुवात दुपारी तीन वाजता भगवान श्री सत्यनारायणाच्या महापूजेद्वारे करण्यात आली. तसेच प्रभू रामलल्लांच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा विधी पार पडले. ही पूजा पुरोहित श्री अनंत जोशी व
महेश स्वामी यांच्या मंत्रोच्चारात तसेच कार्यक्रमाचे यजमान रितेश व राजेश गांधी दांपत्य यांच्या हस्ते संपन्न झाली.सायंकाळी पाच वाजता श्री गणेश सत्संग मंडळ, तळवली वण्याच्या वतीने ह.भ.प. विजयानंद महाराज तेलंगे यांनी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त हरिपाठ सेवेचे आयोजन केले. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमात पारंपारिक खालुबाजा, शंखनाद यांसह स्फूर्ती ढोल पथक रोहा, वीर हनुमान नवतरुण मंडळ तिसे तसेच कैलासवासी कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम व लाठी-काठीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी या संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.जय श्रीराम | जय शिवराय
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













