मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीरीत्या संपन्न
प्रतिनिधी
रायगड (पनवेल) :- लक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल-पनवेल आणि ग्रामस्थ मंडळ लोधिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर हनुमान मंदिर, लोधिवली येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. शिबीर शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडले.शिबिरादरम्यान अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्यांची नोंदणी करण्यात आली. 
आयोजकांच्या वतीने तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोबाईल नंबर व शस्त्रक्रियेसाठी आधारकार्ड व रेशनकार्डच्या झेरॉक्ससह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.संपर्कासाठी:श्री. प्रशांत गायकवाड (कॅम्प कोऑर्डिनेटर, लक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल) – ८६५५३४९७२३ श्री. निखिल पाटील आयोजक: ग्रामस्थ मंडळ, लोधिवली ग्रामस्थांच्या उत्तम प्रतिसादामुळे शिबिर यशस्वी झाले असून अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना पुढेही चालना देण्याचा आयोजकांचा मानस आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













