जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटीस्कँन बंद ,रूग्णांचे हाल
प्रतिनिधी स्वाती जाधव
रायगड /आलिबाग :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२६ अलिबागमधील जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटीस्कँन मशीन गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. दुरूस्ती करण्यास विलंब होत असल्याचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. रूग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रूग्णांचे हाल होत आहे. सिटीस्कँन विनाच परतावे लागत आहे.रूग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रूग्णांना हाल होत आहे. सिटीस्कँन विनाच रूग्णांना परतावे लागत आहे त्यामुळे रूग्ण प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालय १९८०-८१ या कालावधीत उभारले.तीन मजली असलेल्या इमारतीमध्ये २५० खाटांचे रूग्णालय आहे. या रूग्णालयात दर दिवशी सुमारे ६०० हून अधिक रूग्ण बाह्यरूग्ण कक्षामध्ये उपचारासाठी येतात.
पोलादपूरच्या टोकापासून पनवेल,उरण अशा अनेक तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील रूग्ण अलिबागमधील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येतात.रुग्णालयांमध्ये चांगली सेवा मिळेल या आशेने जाणारा रूग्णांची घोर निराशा होत असल्याने चिञ पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील तळागाळातील घटकाला चांगली आरोग्यसेवा देण्याचा दावा रूग्ण प्रशासनाकडून कायमच केला जात आहे. माञ,जिल्ह्यतील रुग्णालयांमध्ये वैघकीय अधिकारांसह दंतचिकित्सक,परिचारिका,प्रशासन अधिकारी,अधिपरिचारिका अशी अनेक पदे रिक्त असल्याची ओरड कायमच आहे.त्यात कार्यरत डाँक्टर,कर्मचारांचा भरोवशावर रूग्णालयाचा कारभार चालविला जात आहे. खासगी दवाखान्यात सिटीस्कँन महाग आहे. दर सर्वसामान्यांना न परवडण्यासारखे आहेत.अलिबागमधील जिल्हा सामान्य रूग्णालयात सिटीस्कँन मशीन गेल्या अनेक वर्षांपासून आहे.दरदिवशी अनेक रूग्ण सिटीस्कँन करण्यासाठी येतात.माञ,गेल्या दहा दिवसांपासून ही मशीनच बंद पडल्याची माहिती रूग्णालयातून समोर आली आहे. या मशीनची टयूब गेली आहे.ती टयूब युनिक वेलनेस या संस्थेमार्फत बसविली जाणार आहे.परंतु,अघाप पर्यत ही टयूब उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या मशीनची दुरूस्ती झाली नाही. गेल्या दहा दिवसांपासून सिटीस्कँनविना उपचार करण्याची वेळ रूग्णांवर आली आहे. आरोग्य विभागाचा सावळागोंधळ यातून दिसून येत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













