नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जेव्हा यंत्रणा दिव्यांगाच्या एका मतासाठी दुर्गम गावात पोहोचते… – आजचा महाराष्ट्र

जेव्हा यंत्रणा दिव्यांगाच्या एका मतासाठी दुर्गम गावात पोहोचते…

चंद्रपूर :- दि.९ चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव गावातील एकूण मतदार २८१ आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमुल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद.सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात ८ ते १४ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.८) अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला.महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय ४०) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना १२ – डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. ८) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक १०, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले अमुल्य मत नोंदविले. सुरेखा ह्या पूर्णपणे दिव्यांग असून त्या एका क्षणासाठीदेखील उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय ९०), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय ८९) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (८५) या वयोवृध्द नागरिकांचेही गृहमतदानाद्वारे मत नोंदविले. या टीममध्ये मतदान अधिकारी नंदकिशोर उपासणी, नागेश उरकुडे, सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्झव्हर) शिवशंकर उपरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप लंगडे, विलास वानखेडे, पोलिस अंमलदार कौमुद मडावी आणि छायाचित्रकार प्रफुल गिरसावडे उपस्थित होते.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]