नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारी पदी खासदार सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती! – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारी पदी खासदार सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती!

प्रतिनिधी

ठाणे (भिवंडी) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारी पदी शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी राष्ट्रीय नेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला मिळावे यासाठीची मागणी संसदेत लावून धरली असून स्थानिक भूमीपुत्रांचे विषय देखील संसदेसह रस्त्यावर न्यायीक लढाई लढून मांडले असल्याने त्यांच्या कामाची दखल घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे पक्षश्रेष्ठी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्याचा आपण प्रयत्न करणार असून, पक्ष वाढीसाठी देखील निश्चितच प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]