नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त कैलासनगर- वळपाडा येथे हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा! – आजचा महाराष्ट्र

श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त कैलासनगर- वळपाडा येथे हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा!

प्रतिनिधी

ठाणे ( भिवंडी) :- (आ. मा. टॉ. टे. न्यु ) भिवंडी तालुक्यातील कैलासनगर- वळपाडा येथे श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा धार्मिक सोहळा शनिवार, २ मे २०२६ ते रविवार, ३ मे २०२६ या कालावधीत भक्तिभावाने व जल्लोष पुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.श्री महागणपती मंदिर, कैलासनगर – वळपाडा येथे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध धार्मिक

व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये. संपूर्ण गावातुन देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत संपूर्ण गावातील महीला वर्ग, युवक, युवती,ज्येष्ठ नागरिक, मोठ्या संख्येने उस्ताहात सहभागी झाले होते. शनिवार, २ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजता ह.भ.प. भारतीताई धसाडे (मु. ढाकणे, कसारा) यांचे कीर्तन झाले. त्यानंतर वराळ देवी भजन मंडळ ताडाली यांचे सुश्राव्य असे भजन झाले.तर रविवार, ३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२ वाजता भागवताचार्य ह.भ.प. महेश महाराज सांळुखे (मु. पाटणोली, पनवेल) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर वारकरी मंडळींचा सन्मान सोहळा कैलास नगर वळपाडा ग्रामस्थांच्या वतीने सभामंडपात करण्यात आला.या हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील भाविकांना अध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाचे सुरेख आयोजन ग्रामपंचायत कमिटी वळ/ वळपाडा, मरूआई महिला मंडळ, बचत गट तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ, कैलासनगर वळपाडा यांच्या वतीने करण्यात आले होते. पंचक्रोशीतील समस्त वारकरी संप्रदाय व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.त्यामुळे सर्वांचे आभार मानून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]