समाज कल्याण न्यासच्या भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदी टारझन पाटील तर साईपालखी अध्यक्ष पदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती!
प्रतिनिधी
ठाणे (भिवंडी) :- समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या आदेशानुसार समाज कल्याण न्यासच्या भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदी श्री.टारझन जयंता पाटील तर साईपालखी अध्यक्ष पदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती गुरुवार दिनांक १८/६/२०२६ रोजी मुख्य कार्यालय सोना कंपाउंड अंजुरफाटा येथे नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. श्री. 
सोन्या काशिनाथ पाटील ,प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, ह.भ.प.विनायक पाटील, श्री.बालनाथ पाटील, यात्रा प्रमुख श्री.के.के.पाटील, संचालक श्री.जयवंत काशिनाथ पाटील उपस्थित होते.गेल्या १८ वर्षांपासून डॉ. सोन्या पाटील यांच्या माध्यमातून श्रावणी पालखी सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













