नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या सभेला गर्दी – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या सभेला गर्दी

प्रतिनिधी तळा संजय रिकामे

रायगड (तळा) :- इंडिया आघाडीने आधीच शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या दोघांमध्येच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.निवडणूक (दि.७) मे रोजी पार पडणार आहे त्या आधी आता निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीतील साखर

या गावातून सोमवारी जनसंवाद यात्रेची सभा घेत दौरा सुरू केला आहे. पोलादपूरची भूमी ऐतिहासिक आहे. शिवकाळात किंवा पेशवाईच्या काळात जेवढे निष्ठावान झाले, त्यात पाहिले नाव नरवीर तानाजी मालुसरे यांचे येत असल्‍याचे उदाहरण गीते यांनी या वेळी संवाद दौऱ्यात दिले. रायगड येथून संवाद यात्रेची सुरुवात केली आहे ही संवाद यात्रा तळा तालुक्यातील बोरघर येथे पार पडली या संवाद यात्रेला तळा तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अनंत गीते यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडाली आहे.यावेळी ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम,खेड दापोलीचे माजी आमदार संजय कदम,युवासेना जिल्हा प्रमुख बंटी पोटफोडे, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, महाड विधानसभा नेते नाना जगताप,जिल्हा महिला संघटक स्वीटी गिरासे, शेकाप पक्षाचे रमेश मोरे,माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी,म्हसळा तालुका प्रमुख नंदु शिर्के,तळा तालुका प्रमुख नितीन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.रायगड लोसकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे अनंत गीते विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजमाध्यमांवर या दोन्ही नेत्यांचे फोटो झळकत असून यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार असे मेसेज व्हायरल होत आहेत.आता प्रत्यक्षात निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे अनंत गीते यांच्या संवाद दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे तळा तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यात बोरघर येथे संवाद दौरा सभा घेण्याचे धाडस तळा तालुका पदाधिकारी यांनी केले आणि त्यांना यश आले कमी वेळेत तळा शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली तळा तालुका प्रमुख नितीन साळवी यांनी चांगल्या प्रकारे या दौऱ्याचे नियोजन केले.अनिल नवगणे यांनी इंडिया आघाडीचे अनंत

गीते हे तटकरेंचा पराभव करतील आणि निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.गत निवडणुकीत चुकीच्या माणसाला आपण निवडून दिले, ही चूक सुधारण्याची वेळ आल्‍याचेही. त्यांनी यावेळी सांगितले राजकीय रणांगण तापायला आता कोठे सुरुवात झाली आहे. अद्याप बर्‍याच सभा, बैठका होणार आहेत. दोन्ही बाजूने प्रचारांच्या तोफा धडाडणार आहेत. त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर देखील विविध कमेंटस्, मिम्स, विविध पोस्ट झळकणार आहेत. त्यामुळे भविष्यात समाजमाध्यम आणि प्रचार सभा यातील युद्ध चांगलेच भडकणार असल्याचे दिसून येते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]