नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोकणात शिमगोत्सव. मोठ्या उत्साहात – आजचा महाराष्ट्र

कोकणात शिमगोत्सव. मोठ्या उत्साहात

प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन

प्राचीन काळापासून चालत आलेला पालखी नाचविण्याचा सोहळा आज पर्यंत चालू

रायगड (श्रीवर्धन) :- फाल्गुन. शुद्ध पंचमी ते रंगपंचमी पर्यंत च्या कालखंडात १७ दिवस चालणाऱ्या उस्तवास कोकण वासी जीवनातील आनंदाचा मोठा सण मानतात प्रत्येक व्यक्ती होळी मध्ये आपले क्रोध लोभ मोह आणि मत्सर.. या माणसाच्या जीवनातील वाईट विचार वाईट आचार यांचे दहन करतात असतात चांगल्या विचारांच्या धुळीची राख आपल्या मस्तकी लावून रंगपंचमीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट विचार वाईट आचार , षडरीपू

ज्यांना दूर लोटत समाजातील संस्कृतीचे आदर्श दर्शन घडवतात. आपल्या जीवनात प्रत्येक माणसाने विविध रंगाची छटा उठवून, आपले जीवन धन्य बनवतात. फार वर्षांपासून चालत आलेली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील, साखरी गावची आई जखमाता देवीची पालखीचे आगमन यावेळी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्या मधील भेंडखोल या गावी होत असते. यावेळी भक्त मोठ्या आनंदात आणि उत्साहात पालखीचे स्वागत करीत पालखी आपल्या डोक्यावर घेऊन नाचतात तसेच या दिवशी देव आणि देवी देवता पालखीत बसून, भक्तगण मोठ्या उत्साहाने वाजत गाजत , ढोल सनईच्या गजरात…संकासुराच्या सोबतीने सर्व लहान थोर मंडळींचे, मनोरंजन करीत गावातील सर्व भक्तगणांना आशीर्वाद देतात. भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी देवी वर्षातून एकदा गावामध्ये येत असते. गावातील वाईट प्रवृत्ती यांचा नाश व्हावा प्रत्येक माणसांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदावी भरभराटी व्हावी उद्योगधंद्यांना अधिक बळ मिळावं या हेतूने प्रत्येक गावकरी वर्षाने येणाऱ्या या देवांना भेटण्याकरता बाहेर गावावरून गावामध्ये येत असतात. यावेळी मोठ्या उत्साहामध्ये देवाची पालखी खांद्यावरती घेऊन नाचत असतात. पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्याची मजा ही फक्त कोकणातच पाहायला मिळते.म्हणून कोकणकर स्वतःला भाग्यवान समजत असतो. होळीच्या सणाच्या वेळी आवर्जून घेतला जाणारा शब्द म्हणजे,आमच्या दाराशी हाय शिमगा… यांनी बोंबा मारत असतात

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]