नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीवर्धन तालुक्यात भोस्ते गावातील वाळीत प्रकरणात प्रशासनाचा अर्धवट निर्णय, – आजचा महाराष्ट्र

श्रीवर्धन तालुक्यात भोस्ते गावातील वाळीत प्रकरणात प्रशासनाचा अर्धवट निर्णय,

चार वाळीत घरांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित.

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावातील वाळीत प्रकरणात तालुका प्रशासनाने अर्धवट निर्णय देण्याची घटना घडली आहे. भोस्ते गावातील काही कुटुंब वाळीत असल्याबाबत वर्तमानपत्रांमधून पण बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच त्या ठिकाणी वााळीत असलेल्या काही महिलांनी या प्रकरणी पोलिसांकडे अर्ज दाखल केले होते. त्या अनुषंगाने आज श्रीवर्धन तहसील कार्यालयात श्रीवर्धन चे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांनी बैठक बोलावली होती. सदर बैठकीमध्ये सुतार समाजातील वाळीत टाकलेल्या घरांना गावामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत समझोता झाला. परंतु कुणबी समाजातील चार घरे वाळीत असल्याबाबत माहिती असून सुद्धा या लोकांबाबत कोणताही निर्णय प्रशासनाने दिलेला नाही. या गावातील कुणबी समाजातील चार घरे देखील त्या ठिकाणच्या ग्रामस्थ मंडळाने वाळीत टाकलेली आहेत. सदर कुटुंबांच्या वतीने या बैठकीमध्ये अर्ज देखील स्वीकारण्यास नकार देण्यात आला. बाकी वाळीत कुटुंबांचा निर्णय लागल्यानंतर सुद्धा चार घरांच्या बाबतीत प्रशासनाने निर्णय का दिला नाही? हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. सदर चार घरांबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास सदरची चार वाळीत कुटुंब रायगडचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]