नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुक्यात राजकीय पक्षांचा उद्घाटन सोहळ्याचा महापूर – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुक्यात राजकीय पक्षांचा उद्घाटन सोहळ्याचा महापूर

प्रशांत (प्रसाद )मोरे

रोहा तालुका तसा रायगड जिल्ह्यातील सामाजिक आध्यात्मिक राजकीय नीतीचा केंद्रबिंदू .संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहील असा रायगड जिल्ह्याचा इतिहास तरीही रोहा तालुक्या वर लक्ष लागून राहील असा त्याचा स्वतंत्र्य इतिहास .

 

रायगड :- लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात त्यामुळे जिल्ह्यापेक्षा रोहा तालुक्यामध्ये विकास कामाच्या भूमी पूजनांचा सोहळा सर्वच पक्षांकडून अधिक पाहावयास मिळत आहे . सत्तेसाठी राजकीय विचित्र महायुती त्यातच नेते मंडळींच्या सतत होणाऱ्या बैठका यांनी भ्रमनिराश झालेला कार्यकर्ता , निष्ठावंत व अनिष्ठावंत कार्यकर्त्यांची लगबग सतत बघावयास मिळते . राज्यात तसे महाविकास आघाडी आणि महायुती असे दोनच परंतु लोकसभेसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए स्थापन झाल्यामुळे रायगड जिल्ह्याला मुख्य उमेदवार मिळणार ते दोनच आताचे आजी खासदार हे मूळचे राष्ट्रवादीचे परंतु एनडीएत असल्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पराभूत उमेदवार , आता पक्ष ऊ बा टा गट परंतु इंडिया आघाडी यांनी पुन्हा एकदा आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उमेदवारीच्या रिंगणात निश्चित झाल्याचे बोलत आहे तसा त्यांचा प्रचाराचा शुभारंभ सुरू झालेला आहे मधल्या काळात महाराष्ट्रात अनेक पक्षांची तूट फुट झाल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे मतदार राजा कोण कोणाच्या बरोबर आहे हे येणारा काळच ठरवेल तसे इंडिया आघाडीचे श्री अनंत गीते त्याने अनेक वर्ष रायगडचे खासदार म्हणून काम केले त्या काळात त्यांनी मंत्रीपदे ही भूषवली कोणत्याही

प्रकारचा भ्रष्टाचाराचा डाग राहिला नाही आलेला सर्व निधी कानाकोपऱ्यातून रायगडच्या विकासासाठी खर्च केला असे ते बोलतात परंतु प्रसिद्धी माध्यम व भूमिपूजन सोहळ्यापासून ते नेहमीच दूर राहिलेले रायगडच्या मतदार राजांना त्यांचा विकास दिसला नाही आणि कळला नाही तसे आपल्या नेत्याचे काम दाखवणे ही कार्यकर्त्यांची जोखीम परंतु त्यात कार्यकर्ता कमी पडलेला दिसत आहे अंतर्गत कार्यकर्त्यांचे नेत्यांचे वादामुळे किंवा अस्तित्वाच्या लढाईमध्ये त्यांचा विकास हरवला सुद्धा असेल आत्ताचे खासदार सन्माननीय श्री सुनील जी तटकरे प्रसिद्ध व्यक्तिमत्व राजकारणामध्ये आपल्या गुरूंचा संपूर्ण अभ्यास अंगीकृत केलेले असे नेते रायगडच्या जिल्ह्यातील सर्वच पक्षांसाठी वेगवेगळ्या कारणांनी परिचित असलेले नेतृत्व आपल्या कुशल नेतृत्वावर त्यांनी स्वतः व आपल्याच कुटुंबातील सदस्यांना रोहा पंचायत समितीचे सभापती , रोहा नगरीचे नगराध्यक्ष , रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ,स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार , विधानसभेचे आमदार , रायगड जिल्ह्याचे पहिले महिला कॅबिनेट मंत्रीपद , विधान परिषदेचे आमदार आणि स्वतः खासदार अशा राजकारणातील अनेक पैलूंचा अभ्यास करून आपल्या नेतृत्वाची झलक महाराष्ट्राला रायगडला दिलेलीच आहे त्याचा धसका विरोधी पक्ष नेहमीच घेताना दिसत आहे त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक वेळा विरोधी पक्षाने नेतृत्वाने एकजूट होण्याचा प्रयत्न केला व विरोध दर्शवला त्यास मतदार राजांनी साथ दिली परंतु रायगड मधील इतरपक्षीय नेतृत्व स्वतःच हित साधणार आहे हे आता मतदार राजांना कळलेला आहे त्यामुळे खासदार तटकरेंचं पारड नेहमीच जड राहिलेला आहे आपल्या कामाची पोचपावती ते नेहमी प्रसिद्धी माध्यमातून तसेच बॅनर बाजी व उद्घाटन सोहळ्यातून दाखवताना दिसत असल्यामुळे ते नेहमी मतदार राजांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत यात अविकास किती व विकास किती हा येणारा काळच ठरवू शकतो परंतु एक नक्की रायगडात राजकारणातलं चाणक्य जर म्हणावं तर ते खासदार तटकरेच नेहमी इतरांच्या विश्वासावर निवडणुका जिंकणारे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक आहेत परंतु आपल्याच घरात नेतृत्वाची फळी तयार करून निवडणुका जिंकणे किती सोप असतं हे राजकीय पक्षातील नेतृत्व करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील नेत्यांना समजणे गरजेचे आहे यासाठी राजकारणातल्या प्रत्येक पायरीचा अभ्यास असणे फार गरजेचा आहे त्यामुळेच तर खासदार तटकरेंची चाणक्य नीति वेळोवेळी सर्व नेते व संघटनांवर भारी पडत असल्याचे दिसत आहे म्हणतात गरजतो तो बरसत नाही बरसतो तो गरजत नाही त्यातच आख्या देशात असलेली भारतीय जनता पक्षाच्या कुशल नेतृत्वाची सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांची लाट असल्यामुळे येणारा काळच ठरवेल ते रायगडचा नेतृत्व हे कोणाला साथ देते कोणाला पाठी ठेवते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]