नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीवर्धन म्हसळा अखंड भंडारी समाज सेवा संघ समाज मंदिराचा भूमिपूजन – आजचा महाराष्ट्र

श्रीवर्धन म्हसळा अखंड भंडारी समाज सेवा संघ समाज मंदिराचा भूमिपूजन

प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे 

मुंबई वसवण्यासाठी दानशूर भागोजी किर यांचे मौलिक काम आहे – खा. सुनील तटकरे 

रायगड (श्रीवर्धन ):- अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन – म्हसळा समाज मंदिराचा भूमिपूजन सोहळा व भंडारी समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व कै. भागोजीशेठ किर यांच्या जयंती व पुण्यतिथी सोहळा रायगड लोकसभा मतदार संघांचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस मतदार संघ अध्यक्ष महमद मेमन, शामकांत भोकरे, तालुका भंडारी समाज अध्यक्ष पांडुरंग तोडणकर, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, अप्पा देवकर, नंदुशेठ पाटील, नरेश बोरकर, प्रतोष कोलथरकर, सुचिन किर, योगेश मांजरेकर, प्रभाकर वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.भागोजी शेठ किर एक असं व्यक्तिमत्व आपल्या बहुजन समाजात जन्माला आलं. मराठी भाषिक म्हणून मुंबई सारख्या महत्वाच्या शहरांत ते राहत होते. अनेक अनेक सुविधा करण्याची मानसिकता ज्यावेळी ब्रिटिशांचे गव्हर्नर त्या कालावधीत दाखवत होते. त्यावेळी त्यांना मौलिक सूचना आणि लाखो रुपयांची देणगी देण्याच महत्वाचे कार्य भागोजीशेठ किर यांनी केल. मुंबईतील अनेक सार्वजनिक इमारती मध्ये त्याच योगदान मोठ्या प्रमाणात असल्याच वक्तव्य यावेळी खा. सुनील तटकरे यांनी केल. मुंबई सारख्या मोठ्या शहरांत आपलं व्यक्तिमत्व निर्माण करत मुंबई घडवण्यात जे योगदान दिल.अशा भागोजीशेठ किर यांची जयंती आणि पुण्यतिथी त्याच बरोबर महाशिवरात्री व महिला दिन असा विलक्षण योगायोग आणि आशा मुहूर्तावर अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन – म्हसळा यांच्या समाज मंदिराच भूमिपूजन आज पडलं आहे. अठरा पगड जातींना बारा बलुतेदार यांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक येत्या ६

जूनला रायगडावर होणार आहे. छत्रपतींना अभिप्रेत असलेल्या अठरा पगड जाती मधील आपण सर्व आहोत. त्यांच्या उत्कर्षांचा कार्यक्रम आज होत असल्याची भावना यावेळी खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. समाज मंदिराच्या उभारणीसाठी पन्नास लाखाचा निधीचा पहिला टप्पा उपलब्ध असून पहिल्या टप्यातील काम पूर्ण होताच दुसऱ्या टप्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही यावेळी खा. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन – म्हसळा येथील भंडारी समाज बांधवाना दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]