गाव चलो अभियाना’ ला सुरवात गोरेगाव भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केली कामाला सुरवात
प्रतिनिधि पांडुरंग माने
रायगड (माणगाव) :- महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. आता भाजपाने पक्षाचा प्रचार करण्यासाठी १० फेब्रुवारीपासून गाव चलो अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या ‘गाव चलो’ अभियानात सर्वांशी संवाद साधण्यात येणार आहे. मोदी की गॅरंटीचा नारा गावोगावी पोहचविला जाणार आहे. गाव चलो अभियानात बूथ प्रमुखांशी बैठक घेतली जाणार, मतदार यादीमधील लोकांशी चर्चा करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, नमो एपबाबत प्रचार करणे, हॅन्ड बिल वाटप करणे, संघाच्या 
वरिष्ठ मंडळींशी चर्चा, युवकांसाठी नमो चषकचे आयोजन करणे, सामाजिक संस्थांशी चर्चा करणे, भिंती रंगवण्याचे काम करणे असे एकूण १८ कार्यक्रम राबविले जाणार आहेत.या अनुषंगाने गोरेगाव विभागातील भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गोरेगाव, लोणेरे, उसरघर, मूर, भिंताड इत्यादी गावात योजना राबवण्यास सुरवात केली आहे हयात माणगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रितेश निवाते, माणगाव ता उत्तर भारतीय अध्यक्ष आनंद राजभर, भाजप चे नेते हरेश शेट,भाजप गोरेगाव शहर अध्यक्ष किशोर रातवडकर, माणगाव ता सरचिटणीस कौस्तुभ वझे इत्यादी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













