नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न – आजचा महाराष्ट्र

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिनिधि पनवेल 

रायगड (पनवेल) :- दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी टाटा मेमोरियल हॉस्पिटल व प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने तळोजा येथील ब्रेक टेस्टिंग ट्रॅक येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

होते. सदर शिबिरामध्ये पनवेल आरटीओ चे अधिकारी / कर्मचारी व ट्रॅकवर उपस्थित सर्व वाहन चालक व परिसरातील नागरिकांनी त्यांचा सहभाग नोंदवला. शिबिरा अंती एकूण ३६ रक्त युनिट संकलित करण्यात आले. मा.श्री अनिल पाटील साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी सुद्धा रक्तदान करून रक्तदान करण्यास इतरांना प्रोत्साहित केले. रक्तदान करण्यात आलेल्या सर्व रक्तदात्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदानाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल तर्फे शिबिरा करिता आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे श्रीफळ आणि शाल देऊन परिवहन विभागातर्फे आभार मानण्यात आले.

रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रादेशिक परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहेत. रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस वेळेवर प्राथमिक उपचार मिळणे व रक्ताची गरज भासल्यास ते उपलब्ध असणे किती गरजेचे असते याचे महत्त्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून पटवून देण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]