नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महानिर्मितीच्या ८०० तंत्रज्ञ-३ पदांच्या निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी १५ ऑक्टोबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन – आजचा महाराष्ट्र

महानिर्मितीच्या ८०० तंत्रज्ञ-३ पदांच्या निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी १५ ऑक्टोबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन

प्रतिनिधी

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा पुढाकार; नियुक्ती आदेश तातडीने देण्याची मागणी

मुंबई :-  दि. १२ ऑक्टोबर २०२६ महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) अंतर्गत तंत्रज्ञ-३ पदासाठी निवड झालेल्या ८०० उमेदवारांच्या नियुक्त्या गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात निवड

झालेल्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फेडरेशनने केले आहे.महानिर्मिती कंपनीने एप्रिल २०२४ मध्ये तंत्रज्ञ-३ पदाच्या ८०० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. लेखी परीक्षेनंतर सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे ८०० उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये महानिर्मिती कंपनीच्या प्रकल्पांसाठी जमीन संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील ४०० उमेदवारांचा समावेश असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. जाहिरातीतील अटी व शर्तींनुसार आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवून अंतिम निवड यादी महानिर्मितीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना निवड न झालेल्या काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया रखडली असून, गेल्या वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या उमेदवारांच्या प्रश्नांकडे महानिर्मिती व्यवस्थापन आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले.

फेडरेशनच्या प्रमुख मागण्या

फेडरेशनने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. जाहिरातीतील अटी व शर्तींच्या अधीन राहून निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती आदेश द्यावेत, अशी पहिली मागणी आहे. न्यायालयीन प्रकरणाचा विचार करून, न्यायालयाचा अंतिम निकाल नियुक्त झालेल्या उमेदवारांना बंधनकारक राहील, अशी अट नियुक्ती आदेशात नमूद करावी, असेही फेडरेशनने म्हटले आहे.याशिवाय महानिर्मिती कंपनीतील मंजूर रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने नवीन जाहिरात प्रसिद्ध करावी आणि भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व न्यायालयीन प्रकरणे एकत्रित करून मुंबई उच्च न्यायालयात चालवावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या आंदोलनाबाबत फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा, उपाध्यक्ष कॉम्रेड एस. आर. खतीब आणि सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवड झालेल्या सर्व उमेदवारांना आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 कॉम्रेड कृष्णा भोयर

सरचिटणीस,

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]