आताच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या प्रगतीसाठी बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड काढावे -डॉ.जयपाल पाटील
प्रतिनिधि रायगड
रायगड (लोणारे) :- केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध योजना जाहीर करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्यांचा हिस्साही भरावा लागतो. प्रत्येक शेतकऱ्याकडे पैसे असतातच असेही नाही. आपले धान्य,भाजीपाला विकल्यानंतर काही दिवसांनी पैसे आपल्या हातात येतात. यासाठी केंद्र सरकारने आपल्याला किसान क्रेडिट कार्डची सवलत दिलेली

असून जास्त शेती असेल त्यांना १ लाख ६० हजार रुपये कमी शेती असेल त्यांना १ लाखापर्यंत किसान क्रेडिट कार्डद्वारे एक वर्षभर बीना व्याजाने पैसे वापरता येतात, आणि ते घेतलेल्या दिनांकाला पुढल्या वर्षी भरावे लागतात. मात्र शेतकऱ्यांचे काम सरकारी योजनेसाठी लागणारे पैसे भरावयास मिळतात. ही आपत्ती आपल्यावर येऊ नये म्हणून किसान क्रेडिट कार्ड काढावे. असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या रायगड जिल्हा कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात कृषी मित्र,अदिवासी सेवक, छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावतीचे संचालक विस्तार,रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले. प्रारंभी रायगड जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले व उपजिल्हा कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. त्यानंतर डॉ. जयपाल पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा ११२ क्रमांकाचा दामिनी ला फोन लावताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे ए.पी.आय श्रीकृष्ण जावळे यांनी दामिनी महिला पोलीस साधना गायकवाड यांना पाठविले. तीने महिलांना ११२ क्रमांक कशी सुरक्षेसाठी मदत करते याची माहिती दिली. त्यानंतर गावामध्ये महिलांना बाळंतपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याची १०२ रुग्णवाहिका मोफत कशी बोलवायची हे प्रात्यक्षिक दाखविताना गोरेगाव आरोग्य केंद्रातून वाहन चालक दीपक भोईर आरोग्य सेविका पद्मिनी कांबळे यांना डॉक्टर विनोद गोरेगावकर यांनी पाठविले.यानंतर डॉक्टर जयपाल 
पाटील यांनी साप व विंचू अंशाच्या वेळी. घेण्याची काळजी व प्रात्यक्षिक दाखविले. आपत्ती व्यवस्थापन कायदाची माहिती सर्वतोपरी उपस्थित यांना दिली. आपल्या शेतावर घरावर जनावरांवर आपत्ती आल्यावर शासन आर्थिक मदत कशी करते. साप व विंचू दंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विमा योजनेद्वारे रुपये २ लाख कुटुंबियांना मिळतात याची माहिती व घरापासून शेतावर कामावर जाताना अचानक विजा चमकून पाऊस पडू लागल्यावर, भारत सरकारने आपल्यासाठी दामिनी ॲप द्वारे आपल्यापासून वीज कुठे पडेल याची माहिती मिळते. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावा असे सांगितले. त्याचबरोबर महिलांना घरातील गॅस. गिझर. वीजेची साधने, त्यापासून कसे सुरक्षित रहावे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील २०० शेतकरी व १०० कृषी अधिकारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













