नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , धनगर समाजाच कामोठे कळंबोली येथे विराट आंदोलन आरक्षण अंमलबजावणीची मागणी – आजचा महाराष्ट्र

धनगर समाजाच कामोठे कळंबोली येथे विराट आंदोलन आरक्षण अंमलबजावणीची मागणी

प्रतिनिधि जितीन शेट्टी

रायगड (पनवेल – कामोठे) :- १७ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथील सकल धनगर समाजाच्या वतीने कामोठे कळंबोली येथे आंदोलन करण्यात आले, कळंबोली मायक्का मंदिर ते कामोठे मायक्का मंदिर अशी पदयात्रा काढण्यात आली, यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज या आंदोलनात सहभागी झाला. धनगर समाजाची एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये दिलेले आरक्षण राजकीय पटलावर

अडवण्यात आलेले असून राज्यभर यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. धनगर समाजाचे नेते अधिवेशनामध्ये आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत असून रस्त्यावर जनता त्यांना पाठबळ देण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून कळंबोली कामोठे येथे महिला व पुरुष बंधू-भगिनींच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती युवक आणि समाज बांधव यांनी हातात घेतलेले पिवळे झेंडे आणि पारंपारिक वाद्य लक्ष वेधून घेत होते. एका बाजूला न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात आली असून दुसऱ्या बाजूला सरकारने सकारात्मक भूमिका घेत धनगर समाजाचा स्वातंत्र्यानंतर प्रलंबित ठेवण्यात आलेला प्रश्न निकाली काढावा यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुंबई नवी मुंबई पनवेल कळंबोली कामोठे परिसरातील सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा सकल धनगर समाज नवी मुंबई या समितीच्या सर्व पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नाने सहकार्याने सहकार्याने यशस्वी झाला, या मोर्चास अशोक मोटे, नानासाहेब मगदूम, तुकाराम सरक, विद्या तामखडे, गणेश बेरगळ, रावसाहेब बुधे, शिवाजी मुढे, सुदाम जरग, साहेबराव खरात, पांडुरंग यमगर, समाधान बंडगर,आण्णा धडस यांनी मार्गदर्शन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]