नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोरगरीब रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी, माय बळीराजा सुरक्षा रक्षक, वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियन नेहमी कटिबद्ध पोलिस अधिकारी श्री. भोसले यांना दिले निवेदन – आजचा महाराष्ट्र

गोरगरीब रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी, माय बळीराजा सुरक्षा रक्षक, वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियन नेहमी कटिबद्ध पोलिस अधिकारी श्री. भोसले यांना दिले निवेदन

प्रतिनिधि नवी मुंबई 

नवी मुंबई :- सामान्य गोरगरीब रिक्षाचालकांच्या विविध तक्रारी जशा की रिक्षाचे टायर,बॅटरी, पडदे, आरसे, वायफर,सीट रिक्षा मधील विविध प्रकारच्या फॅन्सी लाईट्स आणि नेहमीच होणाऱ्या रिक्षांच्या चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे सामान्य रिक्षाचालक भयंकर प्रमाणात त्रस्त झाला आहे. आणि या त्रासातून वैतागलेले रिक्षाचालक माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक

आणि जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य. यांचे संपर्कप्रमुख अविनाश कदम, उपाध्यक्ष नवी मुंबई, दीपक सणस, धनंजय मोरे नवी मुंबई उपशहर प्रमुख, रघुनाथ चव्हाण नवी मुंबई सरचिटणीस,कुमार पवार नवी मुंबई उप सरचिटणीस या पदाधिकाऱ्यांच्याकडे शेकडो रिक्षाचालक चोरींच्या वाढत्या प्रमाणाच्या तक्रारी घेऊन आले होते. रिक्षाचालकांच्या तक्रारी त्यांच्या गरजा समजून घेऊन वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस अधिकारी मा. अजय भोसले साहेब यांना भेटून सविस्तर चर्चा करून. संघटनेतर्फे लेखी पत्र दिले.व लवकरात लवकर या चोरींच्या तक्रारी वरती मार्ग काढावा आणि चोरीचे प्रमाण पूर्णतः थांबवावे अशी विनंती केली. चोरीचे वाढते प्रमाण आणि पोलीस स्टेशनला आलेल्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन मुख्य पोलीस अधिकारी भोसले साहेब यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून यावरती लवकरात लवकर मार्ग काढू असे आश्वासन दिले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]