नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीवर्धन मधील उपविभागीय कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी लादल्या जात असलेल्या जाचक अटी तसेच विनाव्यत्यय दाखले देण्याबाबत कुणबी युवा प्रतिष्ठान श्रीवर्धन वतीने. . प्रांताधिकारी दीपा भोसले यांना निवेदन – आजचा महाराष्ट्र

श्रीवर्धन मधील उपविभागीय कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी लादल्या जात असलेल्या जाचक अटी तसेच विनाव्यत्यय दाखले देण्याबाबत कुणबी युवा प्रतिष्ठान श्रीवर्धन वतीने. . प्रांताधिकारी दीपा भोसले यांना निवेदन

प्रतिनिधि रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन उपविभागीय कार्यालया मध्ये रोज अनेक नागरिक विविध प्रकारच्या दाखल्यां साठी ये. जा करीत असतात परंतु दाखले मिळण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असते.त्यातच काही नागरिकां कडून पूर्वीच्या अधिकारी वर्गाकडून मिळवलेल्या दाखल्या वेळी पुरविण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारावर आत्ता दाखला मागणी केली असता दाखले मिळत नसल्याने नागरिकांना मोठा संभ्रम निर्माण

झाला असून पूर्वीच्या अधिकारी वर्गाने दिलेली दाखले चुकीचे तर नाहीत ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वीच्या अधिकाऱ्याने दिलेली दाखले व आत्ताच्या अधिकाऱ्यांनी दिलेली दाखले त्यामधील कागदपत्राच्या तफावतीमुळे या दाखल्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. यामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्येचा विचार करत श्रीवर्धन तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कुणबी युवा प्रतिष्ठान च्या वतीने समस्येचा विचार करत प्रांत अधिकारी दीपा भोसले यांना निवेदन दिले. यामध्ये प्रांत अधिकारी सोयीनुसार जाचक अटी लादत असून नागरिकांना दाखले मिळवण्या साठी आजच अटींची पूर्तता करताना नाहक मानसिक त्रास करावा लागत आहे. तसेच आर्थिक भुर्दंड ही सण करावा लागत असून अधिकारी वर्ग बदलला की दाखल्यांचा दस्तऐवजाची सुद्धा यादी बदलते का ? असा अधिकार प्रदान करण्यात आला आहे का ? याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २००५ व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनीयमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या प्रतिबंध अधिनियम २००५ अखिल भारतीय सेवा शिस्त अपील नियम१९६९ महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील अधिनियम १९६९यांचे उल्लंघन केले जात असल्याचे व सर्व दाखले मिळवण्यासाठी आवश्यक असणारे शासकीय परिपत्रका प्रमाणे नियमावली तालुक्यातील प्रत्येक कार्यालयात लावण्याची तसेच परिपत्रका प्रमाणे तलाठी यांचा पंचनामा आवश्यक असल्यास तालुक्यातील नागरिकांची गैसोय होऊ नये यासाठी परिपत्रका प्रमाणे तलाठी यांना सांगितल्या प्रमाणे सजेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य करावे तसेच नागरिकांचे विनाव्यत्यय दाखले मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी कुणबी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]