अलिबाग मध्ये मानसे आक्रमक अमराठी पाट्यांना फासले काळे …मनसे ने ३ दिवसाच्या आत मराठी पाट्या लावण्याचा दिला इशारा
प्रतिनिधि सुरेश तांडेल
रायगड (खारपाडा) :- सुप्रीम कोर्टाने सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याचे आदेश दिले होते. यासाठी २५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती. ही मुदत संपली असून आता ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांच्याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अलिबाग शहरात मराठी पाट्या न लावणाऱ्या
व्यापऱ्यांविरोधात खळखट्याक आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अलिबाग शहरात मराठी पाटी नसलेल्या दुकाने, शोरूमच्या फलकाना मनसेने आक्रमक होत काळे फासत तीन दिवसांत फलक मराठीत लावण्याचा इशारा दिला आहे.मनसे मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करीत आली आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांचा आग्रह धरत आंदोलन केले आहे. मनसेने राज्यातील दुकानांच्या आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत असाव्यात अशी भूमिका आधीपासूनच जाहीर केली आहे.राज्यातील दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठी भाषेत फलक असावेत असा नियम असतानाही या नियमाला हरताळ फासला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनावरील नामफलक हे मराठीत लावण्याचे आदेश पारित केले आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













