भोकरदन तालुक्यातील वाकडी कुकडी येथे साखळी ठिय्या आंदोलन

जालना :- जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांच्याच आदेशानुसार सर्कल साखळी ठिय्या आंदोलन भोकरदन तालुक्यातील वाकडी कुकडी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये सर्व गावकरी व तसेच सर्व शाळकरी मुले व मुली, मोठ्या संख्येने हजर होत आहेत. ठिय्या आंदोलनामध्ये भाग घेणार्या आंदोलकांसाठी रात्री भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
आयोजकांनी यावर बोलताना सांगितले की आरक्षणामुळे शिक्षणात व नोकरीत मोठ्या प्रमाणात नुकसान मराठा समाजातील युवकाचे होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी सरकार पुढे ठेवण्यात आली आहे विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील युवकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येते मराठवाड्याच्या काही भागातील कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही दोघांमध्ये भेदभाव का? असा प्रश्न जरांगे पाटलांनी सरकार पुढे मांडला आहे लवकरात लवकर मराठा युवकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यासाठी ३० दिवस सरकारने मागितले होते व जरांगे पाटील यांनी समाजाला विचारून सरकारला १०, दिवस अधिक दिले अशाप्रकारे सरकारला चाळीस दिवस दिले असून सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलून त्यांची आरक्षणाबाबत भूमिका अजूनही त्यांनी स्पष्ट केली नाही. पुढील दिशा म्हणून जरांगे पाटील यांनी अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे तसेच सर्व महाराष्ट्रात साखळी उपोषण आंदोलन करण्याचे मराठा समाजाला सांगितले आहे समाजातील बांधवांना कुठेही गाल बोट न लावता शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळाले पाहिजे या हेतूने शांततेत आंदोलन करा असे जारंगे पाटील यांनी सांगितले आहे. हो आम्ही जरांगे पाटील यांच्या आदेशाचे पालन करून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील समस्त गावकरी मंडळी,योगेश सिरसाट ,बाबुराव सिरसाट,सुकदेव सिरसाट,यांनी सर्व समाजाला सांगितले जरांगे पाटलांच्या आदेशाचे पालन करून आम्ही हे आंदोलन करत आहोत असा इशारा युवा संघटना कार्यकर्त्यांनी दिला
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













