नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील महिलांचा विराट एल्गार मोर्चा, मराठा आरक्षणावर गप्प असणार्‍या मराठवाड्यातील आमदार खासदारांना महिलांंनी साडी चोळी बांगड्यांचा आहेर पाठवुन रोष व्यक्त केला – आजचा महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील महिलांचा विराट एल्गार मोर्चा, मराठा आरक्षणावर गप्प असणार्‍या मराठवाड्यातील आमदार खासदारांना महिलांंनी साडी चोळी बांगड्यांचा आहेर पाठवुन रोष व्यक्त केला

प्रतिनिधि श्रीकृष्णा शेळके

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन अंतरवाली सराटी येथे गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा उभा करून उपाशी राहुन स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या न्यायहक्कासाठी लढत असलेले मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना सरकारने ३० दिवसाची मुदत द्या आरक्षण देतो असे वचन दिले होते.जरांगे

पाटलांनी त्यात अजुन १० दिवस वाढवुन देऊनही वचनपुर्ती न करणार्‍या दळभद्री शासनाचा निषेध व मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या मराठवाड्यातील आमदार खासदार,विधाननपरीषद सदस्य यांचा निषेध म्हणुन भोकरदन येथे शिवाजी चौकात ता,२८ रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता महिला एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाच्या सकल मराठा समाजातील महिलामंडळीच्या वतीने साडी चोळी बांगड्याचा आहेर

स्पिड पोस्टाने पाठवण्यात आल्या.दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासुन चालू आहे मराठ्यांनी ५८ मोर्चे शांततेत काढले आहेत मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजाची बाजु समर्थपणे पेलत असतांना मराठा समाजातील नेते आरक्षणावर एकही शब्द बोलतांना दिसत नाही याचा रोष म्हणुन सकल मराठा समाजातील महिला मोर्चेकर्यांनी मराठवाड्यातील आमदार खासदारांना हा अनोखा आहेर पाठवुन वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.या एल्गार मोर्चात तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता ,छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळुन मोर्चाला सुरुवात झाली तिथे महिलांची आरक्षणावर भाषणे झाली त्यानंतर पोस्ट आॅफीसपर्यंत मोर्चा नेत मोर्चाचा शेवट करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]