श्रीवर्धन आगार व्यवस्थापन. अधिकारी वर्गा मुळे बस सेवा कोमात जाण्याच्या मार्गावर, प्रवाशांचा कल खाजगी वाहतुकीकडे
प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे
रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन आगारातून वर्षांपासून प्रवाशांची मागणी असून सुद्धा नवीन बस चालू करण्यात आलेली नाही उलट जून्या चालू असणा-या बसेस सतत चालू- बंद करण्याची मालिका सुरू असल्याने प्रवाशांचा महामंडळावरील विश्वास उडत आहे. नविन बस चालु करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात आल्यानंतर समाधाना पोटी १० ते १५ दिवस बस चालू होते पुन्हा प्रवाशांना कळण्या आधीच ती पुन्हा बंद ही करण्यात येते.याबाबत प्रवाशांना कोणतीही माहीती दिली जात नाही तसेच ठरवून दिलेल्या वेळेत बस 
कधीच सुटत नाही,ऑनलाईन रिझर्वेशनला सुध्दा सदर बस नसते नंतर प्रवाशी मिळत नसल्याचे कारण सांगून सदर बस बंद करण्यात येते. चालू असलेल्या बसेस बाबतीतही हीच आवस्था आहे. श्रीवर्धन आगारातून दूपारी १.३० वाजता सुटणारी श्रीवर्धन माणगाव रेल्वे स्टेशन माणगाव दिघी, संध्याकाळी ६ वाजता सुटणारी म्हसळा श्रीवर्धन,सकाळी ५ वाजता सुटणारी श्रीवर्धन मुंबई,४.४५ वाजता सुटणारी मुंबई श्रीवर्धन तसेच लाॅकडाउन पुर्वी बागमांडल्या पर्यंत जाणारी व मुंबई मधून श्रीवर्धनकडे येणारी पहीली बस. ह्या बसेस 
आचानक का बंद करण्यात आल्या ? ह्या बसेसना सुद्धा प्रवाशी मिळत नव्हते का? आगारातुन पहाटे सुटणा-या बसेस बाबतीतही अनेक आडचणी आहेत. कधी वाहक तर कधी वाहन चालक वेळेत हजर नसतो. यामुळे सकाळच्या बसेस वेळेत कधी सुटतच नाहीत. काही वेळा तर अचानक पणे बस ही रद्द करण्यात येतात. बस आहे की रद्द केली ह्याची चौकशी करण्याकरीता तिथे कोणीही कर्मचारी उपलब्ध नसतो .मग एसटी महामंडळावर प्रवाशांनी विश्वास कसा ठेवावा कारण सकाळी लवकरच्या बसने जाणारा प्रवाशी त्याचे लवकर काम असते म्हणूनच प्रवास करित असतो. तसेच मुंबई,बोरीवली,नालासोपारा कडून श्रीवर्धनकडे येणा-या बसेस मध्ये पनवेल ते नागोठणे मार्गावरील सर्व लोकल थांबे श्रीवर्धन आगाराला दिल्याने पनवेल मधून श्रीवर्धन बस पकडणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत असते. परंतू ह्या बसेस नागोठणेमध्ये आल्यावर खाली होतात.जागा न मिळाल्याने श्रीवर्धन,म्हसळा,बोर्ली,दिघी कडे येणारा प्रवाशी पनवेल मध्येच रहातो मग तो ईतर आगाराच्या बसने अथवा खाजगी बसेसने माणगाव गाठतो.पुढे जाण्याकरीता श्रीवर्धन बस शिवाय पर्याय नसतो तसेच एका बस वर पुढील ग्रामिण भागातील बस चा अंदाज लावलेला असतो.प्रश्न असा निर्माण होतो श्रीवर्धन आगाराच्या बसना सर्व थांबे कशासाठी ?महामार्गावरुन फक्त श्रीवर्धन आगाराच्याच बसेसच धावतात का ? लोकल बस पेण पनवेल, रोहा पनवेल,माणगाव पनवेल, एवढ्या बसेस चालू असताना तसेच इतर तीन आगार असताना श्रीवर्धन आगाराच्या बसेसवरच जबरदस्ती का ? मग प्रवाशी मिळत नाहीत ही ओरड करुन श्रीवर्धन आगाराची बस बंद करण्यात येते यात श्रीवर्धन,म्हसळा तालुक्यातील जनते सोबत महामंडळाचे सुद्धा नुकसान होत असुन सर्व गोष्टिंचा विचार महामंडळाने करणे आवश्यक आहे. रायगड,नंतर राज्यात एक नंबर असणा-या आगाराची आज बिकट आवस्था झालेली आहे. त्यामुळे श्रीवर्धन,म्हसळा तालुक्यातील प्रवाशी खाजगी वाहतुकीकडे वळत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













