ऐनवाळ ग्रामपंचायत जलजीवन योजनेत भ्रष्टाचार
प्रतिनिधि रोहा
रोहा तालुक्यातील ऐनवाळ ग्रामपंचायत मध्ये जलजीवन मिशन योजनेत तेथील सरपंच श्री.विश्वनाथ बाबू धामणसे यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्राम पंचायत सचिव यांच्या संगण मताने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केले
रायगड (रोहा) :- तालुक्यात जलजीवन मीशन योजनेतून ग्राम पंचायती मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप वेळोवेळी प्रसारमाध्यमातून होत आहेत परंतु प्रत्यक्षात तशी लेखी तक्रार कोणी केली नाही तालुक्यातील अशीच दुर्गम भागातील ऐनवाळ ग्रामपंचायत मध्ये अशाच प्रकारच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम तेथील ग्रामस्थांनी धाडस दाखवून केलं सात सदस्य असलेला या ग्रामपंचायतीमध्ये एक हाती सत्ता असलेले सरपंच श्री. विश्वनाथ 
बाबू धामणसे यांनी जल जीवन मिशन योजनेतील काम नोंदणीकृत मिळालेल्या ठेकेदाराकडून आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करून स्वतः करण्यास घेतले याबाबत तेथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी सरपंच व त्यांच्या निकृष्ट दर्जाचे कामास विरोध केला परंतु सत्तेत व पदात मदमस्त असलेले सरपंच यांनी विरोध करणाऱ्या लोकांना स्थानिक कामांच्या गरजांमध्ये त्रास देण्यास सुरुवात केली ग्रामपंचायत मधील सदस्यनाही हाताशी धरले लोकांमध्ये कलह निर्माण होईल अस प्रयत्न केले प्रामुख्याने त्यांना ग्रामपंचायत सचिवाची साथ मुख्यता लाभली तेही त्यात सामील झालेले दिसत आहेत कामामध्ये निकृष्ट दर्जाचे पाईप लाईन वापरून ते वरच्या वर टाकण्यात आले आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे टाकीचे काम सुद्धा 
निकृष्ट दर्जाचे करुण काही जुने मट्रेल वापरण्यात आले काही रिपेअर करून वापरण्यातआले आहे विहीर बावडी मधला गाळ तसाच ठेवून योजना घाई गडबडीत चालू करुण सरपंच व सचिव कामाचे बिल काढण्याचा प्रयत्नात असतानाच ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबवून त्याबाबत तक्रार अर्ज मा. तहसीलदार साहेब रोहा, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती रोहा, जिल्हा कार्यालय आलिबग तेथे पाठवले आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













