नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत कलशच्या निर्माण साठी पाठवण्यात येणाऱ्या अमृत कलशाची मिरवणूक रानवली गावातून – आजचा महाराष्ट्र

देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत कलशच्या निर्माण साठी पाठवण्यात येणाऱ्या अमृत कलशाची मिरवणूक रानवली गावातून

प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत श्रीवर्धन तालुका स्तरीय अमृत कलश कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणा मध्ये साजरा करण्यात आला.श्रीवर्धन तालूक्यातील ४३ ग्रामपंचायत हद्दीतील मूठ भर माती या अमृत कलशामध्ये संकलित करण्यात आली आहे ही माती देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत

वाटिका निर्माणासाठी पाठवली जाणार आहे.अमृत कलशाची मिरवणुक रानवली गावातून लेझिम पथकामध्ये वाजत गाजत काढण्यात आली.या कार्यक्रमास गजानन लेंडी – गट विकास अधिकारी,सुरेश मांडवकर – सरपंच,किशोर नागे – विस्तार अधिकारी, अताउल्ला जळगावकर- उपसरपंच, समीर फोपलनकर,भाविका जोशी,रिया बांद्रे, करुणा जाधव- सदस्य,अभिजीत माने- ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी कर्मचारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक,राजीप शाळा मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. ए.आर. उंड्रे स्कूल चे मुख्यापक, शिक्षकवृंद,अंगणवाडी सेविका,आशा सेविका , विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]