दिघी रोडवर गतीरोधक ,दिशादर्शक फलक अभावी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
श्रीवर्धन प्रतिनीधी / रामचंद्र घोडमोडे
विद्यार्थी,पालक. शिक्षक. यांचा अपघात घडल्यास जबाबदार कोण ?
रायगड (श्रीवर्धन) :- ग्रामपंचायत कार्यालय-दिघी अंतर्गत दिघी गावामध्ये रा.जि .प.प्राथमिक मराठी शाळा १ ली ते ४ पर्यंत आहे. शाळेमध्ये दिघी गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असुन.काही वर्षांपूर्वी सदर शाळे समोरून दिघी पोर्टला जाण्यासाठी सिमेंट कांक्रिटचा रस्ता बांधण्यात आला आहे.परंतू सदर रस्त्यावर गतीरोधक तसेच दिशादर्शक फलक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले नाही.रस्त्यावरून दिघी पोर्ट च्या अवजड वाहनांसह इतर वाहनांची नेहमी वर्दळ असते. परंतु शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक यांचे साठी वेगळी रहदारी लेन तसेच 
रस्ता क्रॉस करण्यासाठी कोणताही पूल तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्राथमिक शाळा रा.जि.प. मध्ये जाणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांस अनावधानाने अपघात झाल्यास किंवा इतर काहीं विपरित घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न स्थानिक नागरिकां कडून उपस्थित करण्यात येत आहे.सहा वर्षांपूर्वीच दिघी गावातील एका दक्ष नागरिकाने याबाबत दिघी पोर्ट आणि व्यवस्थापन यांस लेखी पत्रव्यवहार करून उपाय योजना करण्याची विनंती केली होती. तसेच इतरही स्थानिक नागरिकांकडून संबंधित शासकिय यंत्रणेकडे वारंवार तोंडी तसेच लेखी पाठपूरावा सुध्दा केला आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत.
अनावधाने विद्यार्थी, पालक , शिक्षक किंवा स्थानिक नागरिक यांस अपघात झाल्यास किंवा काही विपरित घडल्यास सदर समस्येवर उपाय योजना न करता सोपेचे सोंग घेतलेली , कुंभकर्णा सारखी झोपेत असलेली संबंधित शासकिय यंत्रणा आणि लोकप्रतिनीधी यांसह दिघी पोर्ट प्रशासन मुडद्याच्या टाळूवरचे लोणी चाटण्यास कधी मिळेल त्याची वाट तर पाहत नाही? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













