महिलांचा पाककलाविष्कार: रानभाज्या व पौष्टिक तृण धान्य पाक कला स्पर्धा तळा तालुका येथे संपन्न

रायगड (तळा) :- रानभाज्या, त्यांचे महत्त्व, त्यातील पोषक घटक व त्यापासून बनणाऱ्या रुचकर पाककृती यांची लज्जतदार माहिती देण्यासाठी रानभाजी पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आत्मा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते

शहरात राहून नेहमीच्या वापरात असलेल्या कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची या भाज्यांव्यतिरिक्त आपण दुसऱ्या भाज्या खात नाहीच. बहुतांश जणांना रानभाजी म्हणजे काय याची माहितीदेखील नाही. याकरता गावातील महिलांना एकत्र आणून त्यांना यात सहभागी करून रानभाजी शहरात पोहचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेतून रानभाज्यांच्या विविध पाककृती बनवण्याच्या पद्धती हे सगळच बघता आणि शिकता येईल.

तळा तालुक्यातील मेकडे हॉल येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेमध्ये ४३ महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला व रानभाज्या प्रदर्शनामध्ये २३ प्रकारच्या रानभाज्या व माहिती प्रदर्शीत करण्यात आली होती.पाककला स्पर्धेमध्ये ज्वारीचे थालपीट,भारंगीची भाजी,कार्टुली भाजी,नाचणीची पुरणपोळी,ओव्यांच्या पानांची भाजी,कोवळ्या बांबूची भाजी,सुरणाचे स्टेफिंग रोल,रानभाजी पॅटिस,नाचणी आप्पे,टेहरीचे पराठे,नाचणीची डोसा इडली,रानटी केळ फुलांचे कटलेट,करटोली सँडविच,करटोली माठ पिझ्झा अश्या अनेक नाविन्यपूर्ण भाज्या तयार करण्यात आल्या होत्या व भाज्यांची मांडणी देखील आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती हे सर्व पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षक सुद्धा हे सर्व पाहुन भारावून गेले होते त्यांना सुद्धा बरेच नवनवीन पदार्थ या स्पर्धेत पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे ,आर डी सी बँक संचालक ज्ञानेश्वर भोईर,तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे ,मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव कृषी पर्यवेक्षक जितेंद्र गोसावी ,आत्मा बीटीएम सचिन लोखंडे,कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे परीक्षक म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके,महसूल नायब तहसीलदार सुरेखा घुगे,नायब तहसीदार दिपाली शेळके प्रकल्प अधिकारी महिला बालकल्याण मधुकर वारंगे प्रगतशील शेतकरी यांनी कामकाज केले.सदर स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे व १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे आनंद कांबळे यांनी सांगितले. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद तसेच नाविन्यपूर्ण पदार्थ व आकर्षक मांडणी यामुळे स्पर्धेत सहभागी महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













